गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शनिवार, 9 मे 2015 (12:33 IST)

सर्वात स्वस्त स्मार्टफोन Z2चा फोटो लीक

स्मार्टफोनच्या जगात नंबर-1 ब्रांड सॅमसंगचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन Z2चा फोटो लीक झालाय. हा फोन आगामी काही महिन्यांमध्ये बाजारात येतोय. अँड्रॉइडशिवाय हा फोन Tizen  ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. ऑनलाइन लीक झालेल्या फोटोमध्ये सॅमसंग Z2 गॅलेक्सी SIII  आणि गॅलेक्सी S4 सारखा दिसतो. कंपनीची योजना आहे की, हा फोन अशाच बाजारात आणायचाय जिथं स्मार्टफोन विक्री जास्त आहे, असं सांगितलं जातंय. कंपनीच्या या नव्या स्वस्त स्मार्टफोनमध्ये 32-bit-quad-core CPU आहे. यात 2000mhची बॅटरीही यात असेल. सॅमसंग Z2 मध्ये qHD TFT - LCDडिस्प्ले असेल आणि हा स्मार्टफोन पहिलेपासूनच बाजारात असलेल्या Z1ला रिप्लेस करेल. आतापर्यंत या फोनच्या किमतीबाबत कोणतीही बातमी आली नाहीय. पण याची किंमत Z1च्या किमतीच्या जवळपास असेल असं सांगण्यात येतंय. ऑनलाइन बाजारात सॅमसंग Z1ची किंमत अवघी 5,500 रुपयांच्या जवळपास आहे.