शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2014 (17:07 IST)

सॅमसंगचा गॅलेक्सी मेगा २

सॅमसंगच्या अँड्रॉईड फोनला बाजारात जास्त प्रमाणात मागणी असते. या मागणीच्या जोरावर सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्रॉडक्ट बाजारात आणत असतो. त्याचप्रमाणे आता सॅमसंगने आपला नवीन डिव्हाईस गॅलेक्सी मेगा २ लाँच केला आहे. 
 
हे नवीन मॉडेल कंपनीने ई-स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. गॅलेक्सी मेगा ५.८ व गॅलेक्सी मेगा ६.३च्या यशानंतर कंपनीने पुढे पाऊल टाकत सॅमसंग गॅलेक्सी मेगा २ (एसएम-जी७५0एचएनकेए) आणला आहे. यामध्ये ७२0 गुणे १२८0 पिक्सल रिझोल्युशनसोबत ६ इंचांचा टीएफटी एचडी डिस्प्ले आहे. तसेच १.२ जीएचझेड क्वाड प्रोसेसर व १.५ जीबीचा रॅम आहे. 
 
याची किंमत २0,९00 रुपये आहे. गॅलेक्सी मेगा २ अँड्रॉईड ४.५ किटकॅट ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित आहे आणि यामध्ये ८ जीबीचे इनबिल्ट स्टोअरेज आहे. ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते. यामध्ये एलईडी फ्लॅशसोबत ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा व ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असणार आहे.