शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 16 जुलै 2014 (17:14 IST)

सॅमसंगने भारतात लाँच केला गॅलॅक्सी कोर 2

सॅमसंगने नुकतेच सामान्य किमतीत एंड्रॉयड किटकॅट 4.4 वर चार स्मार्टफोन सादर केले होते. त्याने आपला स्मार्ट फोन गॅलॅक्सी कोर 2 लाँच केला आहे.   
 
या स्मार्ट फोनमध्ये 4.5 इंच टीएफटी डिस्प्लेचा डिस्प्ले आहे. 1.2 गीगाहर्ट्ज क्वार्डकोर प्रोसेसर, 768 एमबी रॅम आणि 4 जीबी इंटर्नल स्टोरेजसोबत हा काम करतो. फोनची मॅमरी वाढवण्यासाठी 64 जीबीपर्यंत मायक्रोएसडी कार्ड स्पोर्टची सुविधा देण्यात आली आहे.   
 
काळ्या आणि पांढर्‍या रंगात उपलब्ध गॅलॅक्सी कोर 2 भारतात 11,900 रुपयाच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा आणि वीजीए फ्रंट कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 2000 एमएएचची आहे.