शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जून 2014 (17:31 IST)

सॅमसंगने लाँच केला गॅलेक्सी S5 ब्रॉडबँड एलटीई-A

कोरियाई कंपनी सॅमसंगने एक  नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. गॅलेक्सी S5 ब्रॉडबँड एलटीई-A नावाच्या या स्मार्ट फोनमध्ये शानदार डिस्प्ले आहे 2560x1440 पिक्सल रिजॉल्यूशनसोबत 5.1 इंचीचे स्क्रीन आहे.  पिक्सलमुळे याचे फोटोही जोरदार येतात. 

सध्या जगात डाउनलोडची गती 75 एमबीपीएस आहे. गॅलेक्सी S5 ब्रॉडबँड एलटीई-A एलटीई एडवांसला सपोर्ट करतो, यामुळे डाउनलोडची गती 225 एमबीपीएस होते. मोठ्या मोठ्या फाईल्स लगेचच डाउनलोड होतात. 

या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत 16 मेगापिक्सल कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरा 2.1 मेगापिक्सलचा आहे. त्याशिवाय यात फिंगर स्कॅनर, बायोमॅटिक स्क्रीन लॉकिंग फीचर आणि बिल्ट इन हार्ट मॉनीटरपण आहे. हा स्मार्ट फोन डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंट आहे.

3 जीबी रॅम असणारे या स्मार्ट फोनमध्या मेमोरी कॅपिसिटी 32 जीबी आहे, ज्यात 128 जीबी पर्यंत वाढवू शकता. 2800 एमएएचची बॅटरी. सध्या या स्मार्ट फोनला कोरियात लाँच करण्यात येत आहे. या फोनची किंमत 919 डॉलर (किमान 55340 रुपये) आहे.