बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (17:06 IST)

सेल्फी

लोकांना स्वत:चे वेगवेगळ्या एँगलमध्ये फोटो काढणं पूर्वीपासून भलतंच आवडतं. आणि आता स्मार्टफोन आणि फेसबूक, व्हॉटस् अँप सारख्या टेक्नॉलॉजी आल्याने यात कमालीची भर पडली आहे. काही झालं की, टाक फोटो काढून एफ. बी....यात भरीस भर म्हणजे सेल्फीज्! मजेशीर बाब तर ही आहे की, ऑक्सफोर्डने 'सेल्फी' या शब्दाला २0१२ या वर्षीचा सर्वात चर्चित शब्द म्हणून आपला ठप्पा मारला आहे. 
 
याची सुरुवात नाही पण एक महत्त्वपूर्ण घटनाही या सेल्फीचा कळत नकळत भाग होऊन बसली आहे. ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांची. मंडेला यांच्या निधनाला गेलेल्या ओबामांच्या सेल्फीमुळे झालेल्या विवादांमुळे 'सेल्फी' हा शब्द सर्वात चर्चिंत झाला. त्यानंतर डॉग सोबत डेल्फीज्, हेयरस्टाईल्स्च्या हेल्फी आणि वेलनेस वरून वेल्फी या संज्ञाही प्रचलित झाल्या. याचा कहर म्हणजे इंस्टाग्रामवर दररोज ५.५ करोड सेल्फीज् अपलोड होत असतात. याला काय म्हणावं...