गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 18 सप्टेंबर 2014 (12:13 IST)

स्पाइसचा ड्रीम युनो

आधुनिक तंत्रज्ञान, जोरदार वैशिष्ट्ये, बोल्ड डिझाइन आणि अँप्समधील सर्वोत्तम सर्व एकत्र करून आणि त्याला फास्ट तरीही स्मूथ यूजर अनुभव जोडणार्‍या स्पाइस कंपनीने 'ड्रीम युनो' हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. ड्रीम युनोला अँण्ड्रॉइड वनने सार्मथ्य दिलेले आहे. या ड्युएल सिम ३जी स्मार्टफोनला १.३ गीगाहर्ट्झ क्वाड कोअर प्रोसेसरचे सार्मथ्य दिलेले आहे आणि ४.४.४ किटकॅटवर चालणारा आहे. हिंदी, तेलुगू, बंगाली, तमीळ इत्यादी १७ भारतीय भाषांना हा स्मार्टफोन सहाय्य करणारा आहे. त्याचबरोबर २५ जीबीच्या मोफत क्लाऊड स्पेससकट १0 जीबी स्पाइस क्लाऊड आणि १५ जीबी गुगल ड्राईव्ह देण्यात आले आहे.
 
वैशिष्ट्ये
४.४.४ किटकॅट ओएस
१.३ गेगाहर्ट्झ क्वाड कोअर प्रोसेसर
आयपीएस डिस्प्ले ११.१३ सेमी स्क्रीनसहित
ड्युएल सिम (३जी+३जी)
५ एमपी एएफ + २ एमपी कॅमेरा
४ जीबी रॉम + १ जीबी रॅम १७00
एमएएच लाय-पॉलिमर बॅटरी
वाय फाय, एचएसपीए+, ब्ल्युटूथ एफएम रेडिओ
दिशा मार्गदर्शक नकाशे
आवाजावर आधारित शोध
भाषांतर
अँनिमेशनचा वाढीव वेग
सेन्सस : ग्यरो, मॅग्नेटिक, हलके आणि जवळीक
३.५ एमएम जॅक
कॅमेर्‍यात एलईडी फ्लॅश
 
स्मार्टफोनच्या बाजारात निर्माण झालेली तीव्र स्पर्धा लक्षात घेऊन स्पाइसने ड्रीम युनो अँण्ड्रॉइड वन स्मार्टफोनवर अतिरिक्त १0 जीबी मोफत स्टोअरेज आणि डेटा गोपनीयता बहाल केली आहे. हा स्मार्टफोन केवळ ग्राहकांच्या बजेटवर स्वस्त तर आहेच, त्याशिवाय आपल्या हाताच्या बोटांवर उपलब्ध अशा अर्मयादित पर्यायांसहित स्मार्टफोनचा अनुभवदेखील देणारा आहे. स्पाइस ड्रीम युनोला एका सुपर स्टायलिश बॉडीसहित ११.४३ सेमीच्या आयपीएस डिसप्ले देण्यात आला आहे. गाणी, सिनेमे, फोटो आणि व्हिडीओसाठी ३२ जीबीपर्यंत स्टोअरेज वाढविण्याची क्षमता यामध्ये आहे. तो अँण्ड्रॉइड ४.४ किटकॅटवर चालतो आणि २ वर्षांपर्यंत अँण्ड्रॉइडच्या नवीन आवृत्त्यांवर आपोआप अपग्रेड होतो. ५ एमपीचा ऑटो फोकसचा मागचा कॅमेरा तीक्ष्ण प्रतिमा क्लिक करण्यात मदत करतो तर २ एमपीचा पुढचा कॅमेरा सेल्फी प्रेमींना आवडणारा आहे. साधन १७00 एमएएच लाय-पॉलीमर बॅटरीने सज्ज असल्याने दीर्घकाळ चालण्याची हमी देतो.