गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: रविवार, 15 जून 2014 (22:33 IST)

स्मार्टफोन विक्रीत भारत पुढे

आयपीसी फर्मने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतीय बाजारात स्मार्टफोनची मागणी प्रचंड मोठी असून येत्या वर्षअखेर ही विक्री 8.05 कोटींवर जाईल असे दिसून आले आहे. येत्या पाच वर्षात स्मार्टफोन विक्रीत दरवर्षी 40 टक्के वाढ नोंदविली जाईल असेही यात आढळून आले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

जानेवारी, मार्च 2014 मध्ये ही विक्री तब्बल 186 टक्क्यांनी वाढली असून आशिया प्रशांत क्षेत्रात ही वाढ सर्वाधिक आहे. याबाबतीत भारताने चीनला मागे टाकले असून 2014 च्या तिमाहीत 6.10 कोटींवर ही विक्री गेली आहे. फीचर फोनच्या विक्रीत 18 टक्के घट नोंदविली गेली असली तरी त्याची भरपाई स्मार्टफोन विक्रीमुळे झाली आहे कारण स्मार्टफोनच्या विक्रीत 17 टक्के वाढ नोंदविली गेली आहे असेही या सर्वेक्षणात दिसून आले आहे.