शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

स्मार्टफोनची स्क्रीन फुटली आहे, मग करा घरीच दुरुस्त

सध्याच्या पिढीला स्मार्टफोनशिवाय काहीच सुचत नाही. यातच फोनची स्क्रीन फुटल्यावर फोनशिवाय राहणे आणि पैसे खर्च करणे खूपच कठीण काम वाटते. परंतु हेच कठीण काम आम्ही तुम्हाला सोपे करुन देत आहोत. यामुळे तुम्हाला सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही स्वत:च तो दुरुस्त करू शकता.
 
जर तुमच्या फोनची स्क्रीन फुटली असेल तर प्रथम त्याचा बॅकअप घ्या. फोनची स्क्रीन थोडीच फुटली असेल तर त्यावर स्क्रीन गार्ड लाऊन वापर करा. परंतु यावर जास्त भार पडणार नाही याकडे लक्ष द्या. याशिवाय तुम्ही क्लिअर रिपेअटर टेपचाही वापर करू शकता. हा स्क्रीनवर टेपप्रमाणे सहज बसतो. तसेच तुम्ही हे ऑनलाइन बुक करू शकता. परदेशात फोनची स्क्रीन तुटल्यावर याचा खूप मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. तुम्ही फोनची स्क्रीन स्वत:ही नीट करू शकता. यासाठी युटय़ूबवर जावा. येथे फुटलेल्या स्क्रीनसंबंधी खूप काही माहिती मिळेल. व्हिडिओ पाहून तुम्ही स्वत:च घरी हा दुरुस्त करू शकता. तसेच स्क्रीन नीट करण्याचे कीट तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. यामुळे तुम्हाला कमी किमतीत मोबाइल नीट करता येईल. जर तुम्हाला स्क्रीन नीट करण्याची भीती वाटत असेल तर सोशल मीडियाची मदत घ्या. यासाठी तुम्हाला फोनची माहिती घेऊन तुमच्याच फोननुसार ङ्खोन घ्यावा लागेल. असा फोन पाहा, की जो पूर्णपणे खराब असेल, पण त्याची स्क्रीन चांगली असेल. यानंतर तुम्ही या स्क्रीनचा वापर तुमच्या फोनसाठी करू शकता. यामुळे कमी किमतीत फोन नीट होऊ शकतो. फुटलेला हा फोन वापरण्यासारखा नसेल, तुम्ही स्वत: तो दुरुस्त करू शकत नाही. बाजारात हा दुरुस्त करण्यास खूपच पैसे खर्च होणार असतील आणि तरी तो वापरण्यासारखाही नसेल तर तुम्ही हा विकू शकता. जरी हा कमी किमतीत जाईल. परंतु घरात पडून राहण्यापेक्षा कमी पैसे आलेले केव्हाही चांगले.