शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 6 नोव्हेंबर 2014 (16:24 IST)

स्मार्टफोनमुळे हरवतेय नात्यांतील ऊब

एका नवीन शोधानुसार, अर्ध्या रात्रीपर्यंत स्मार्टफोनचा वारंवार वापर करणार्‍या लोकांमध्ये नात्यांतील ऊब कमी होताना दिसतेय. यामुळेच अनेक ब्रेकअप, एकमेकांचा विश्वासघात आणि घटस्फोटांना संधी मिळत असल्याचं धक्कादायक सत्य उघड झालंय. या शोधानुसार, शारीरिक संसर्गाची ओढ कमी झाल्यानं लोकांची आशाही कमीच असते.. त्यामुळे, खराखुरा रोमान्स म्हणजे काय हेही ते विसरून जातात. 
 
या अभ्यासात ब्रिटेनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शोधकर्त्यांनी 24,000 विवाहित जोडप्यांची माहिती घेऊन त्यावर शोध केला. शोधकर्त्यांना सोशल नेटवर्किग साईट आणि वैवाहिक जीवनाच्या संतुष्टीमध्ये एक नकारार्थी धागा सापडला. ‘जी जोडपी सोशल मीडियावर इतरांच्या मजेशीर आयुष्याबद्दल जितकं वाचत आणि पाहत राहतील तितकाच त्यांच्या स्वत:च्या आयुष्यातील निराशा आणि उपेक्षेची नजर वाढत जाण्याची संभावना जास्त आहे’.

वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता iTunes वर देखील, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.