शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शनिवार, 2 मे 2015 (11:05 IST)

‘फ्लिपकार्ट’वरून ऑनलाइन विक्रीचा ‘लिनोव्हा’ला फायदा

ऑनलाइन फोन विक्रीत फ्लिपकार्टने आघाडी घेतली आहे, मात्र याचा फायदा लिनोव्हालादेखील मोठय़ा प्रमाणात झाला आहे. चिनी बनावटीच्या ‘लिनोव्हा‘चे तब्बल एक लाख स्मार्टफोन्स केवळ पंधरा मिनिटांत विकले गेले आहेत. याबाबत लिनोव्हाने एका पत्रकाद्वारे कळविले आहे. ‘फ्लिपकार्टच्या मदतीने सादर करण्यात आलेला ए 6000 प्लसचे एक लाख स्मार्टफोन्स् फिल्पकार्टच्या मदतीने विकले गेले आहेत.’ अशी माहिती लिनोव्हाने दिली आहे. फ्लिपकार्ट डॉट कॉमवर ए 6000 नावाचा 
 
स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला. या फोनची किंमत रुपये 7499 असून त्यामध्ये फोर जीची सुविधाही उपलब्ध आहे. या फोनला डय़ुएल डॉल्बी पॉवरचे स्पिकर्स आहेत. दरम्यान याच स्मार्टफोनची पाच मे पासून फ्लिपकार्टद्वारे पुन्हा विक्री सुरू करण्यात येणार आहे. यानिमित्ताने ऑनलाइन विक्रीमध्ये मोठी संधी असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.