गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. मोबाईल
Written By
Last Modified: शनिवार, 19 एप्रिल 2014 (16:52 IST)

‘व्हॉट्स अँप’ला टक्कर देणार ‘चॅटऑन’

स्मार्टफोनचा वापर सध्या जोरात आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक नवनविन अँप्स असणे आजगरजेचे झाले आहे. सध्या व्हॉट्स अँपची जोरदार चलती आहे. त्यामुळे व्हॉट्स अँप खरेदीसाठी फेसबुकने मजल मारली. व्हॉट्स अँपबरोबरच लाइन, बीबीएम, वीचॅट आदीही अँप्स आहेत. आता यात नव्याने चॅटऑनची भर पडली आहे. सॅमसंगने आपल्या स्मार्टफोनधारकांसाठी चॅटऑन हे अँप्स लाँच केले आहे. त्यामुळे नव्याने आणखी अँप्सची भर पडली आहे. नवी दिल्लीत आज चॅटऑन लाँच केले. अभिनेत्री नर्गिस फाक्री आणि सॅमसंगचे दक्षिण आशियाई मीडिया सोल्युशन सेंटरचे तरुण मलिक यांच्या प्रमुख उपस्थित हे अँप्स लाँच केले. सॅमसंगचे 3.5 व्हर्जन अँड्रॉईड, आयओएस, विंडोज आणि ब्लॅकबेरी यावर उलब्ध असणार आहे. त्यामुळे हे अँप्स व्हॉट्स अँपलाटक्कर देणार का, याची उत्सुकता आहे. अँप्सला 1 जीबी पर्यंत फाईल शेरिंग करणे शक्य होईल.

हिंदी आणि इंग्रजी भाषेत भाषांतर करणे शक्य आहे. या अँप्सवर 1001 सदस्यांचा ग्रुप करणे सहज शक्य आहे. तसेच लोकेशन शेअरिंगची सुविधाही आहे.