मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक लेख
Written By विकास शिरपूरकर|

हरूनही जिंकला विजेंद्र....

PR
त्‍याच्‍यात जि्दद् होती जिंकण्‍याची. त्‍याला भारताचा राष्‍ट्रध्‍वज चीनमध्‍ये उन्‍नत होताना पहायचा होता... आणि म्‍हणून तो लढला. एका लढवय्याप्रमाणे त्‍याने आपल्‍यावर येणारे प्रत्‍येक वार चुकविण्‍याचा आणि प्रतिस्‍पर्ध्‍याला पराभूत करण्‍याचा पुरेपूर प्रयत्न केला. हरियाणातील भिवानी जवळच्‍या कुलवास येथे जन्‍मलेल्या एका बस चालकाच्‍या मुलाने आपल्‍या अभूतपूर्व कामगिरीने भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव कोरले आहे.

  हरियाणातील भिवानी जवळच्‍या कुलवास येथे जन्‍मलेल्या एका बस चालकाच्‍या मुलाने आपल्‍या अभूतपूर्व कामगिरीने भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव कोरले आहे.      
हरियाणातील भिवानी जवळच्‍या कुलवास येथे जन्‍मलेल्या एका बस चालकाच्‍या मुलाने आपल्‍या अभूतपूर्व कामगिरीने भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव कोरले आहे.

याच दिवसासाठी दिवसरात्र प्रचंड मेहनत करणा-या आणि रात्र-रात्र जागून ओव्‍हर टाईम करणा-या त्‍या वृध्‍द डोळयांतही आनंदाश्रू तरळले असतील. प्रत्‍येक आई वडीलांना आणि देशालाही अभिमान वाटावा अशी कामगिरी करून दाखविणा-या त्‍या तरुणाचे नाव आहे विजेंद्रसिंग
ND
महिपाल सिंग ऊर्फ विजेंद्र सिंग. एका सर्वसामान्‍य कुटुंबातून पुढे आलेल्‍या या तरुणाने केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्‍पद आहे. यंदाच्‍या ऑलम्पिकमध्‍ये मोठ्या अपेक्षा असलेले अनेक धुरंधर अपयशी झाले आहेत. अशा परिस्थितीत हरीयाणातील या तरुणाने उल्‍लेखनीय खेळ करीत बॉक्‍सींगमध्‍ये भारताला कास्‍य पदक मिळवून दिले आहे. हरियाणातील भिवानी येथे 29 ऑक्‍टोबर 1985 साली जन्‍मलेल्‍या हा तरुण आशेचा मोठा किरण घेऊन आला आहे.

बीजिंग ऑलम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करणे शक्‍य झाले नसले, तरीही आजवरची सर्वांत चांगली कामगिरी भारतीय खेळाडूंनी केली ही त्यातल्या त्यात महत्त्वाची बाब.

  याच दिवसासाठी दिवसरात्र प्रचंड मेहनत करणा-या आणि रात्र-रात्र जागून ओव्‍हर टाईम करणा-या त्‍या वृध्‍द डोळयांतही आनंदाश्रू तरळले असतील. प्रत्‍येक आई वडीलांना आणि देशालाही अभिमान वाटावा अशी कामगिरी करून दाखविणा-या त्‍या तरुणाचे नाव आहे विजेंद्रकुमार      
सध्‍या हरियाणा पोलिसांत नोकरीस असलेल्‍या विजेंद्रला अगदी लहानपणापासून बॉक्सिंगची आवड होती. त्‍यामुळे तो भिवानी येथील क्रीडा संकुलात सरावास जात असे. बॉक्सिंगमध्‍ये करीयर करण्‍यासाठी त्‍याने सुरुवातीपासूनच प्रचंड मेहनत केली. त्‍यासाठी त्‍याला कुटुंबीयांकडून मोठे सहकार्य मिळाले. बॉक्सिंग प्रशिक्षण संस्‍थेची फी भरण्‍यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी काम करून आपला छंद जोपासणा-या विजेंद्रमध्‍ये असलेली चुणूक तिथे क्रीडा प्रशिक्षक जगदीश सिंग यांनी ओळखली. आणि त्‍याला संधी दिली. राष्‍ट्रीय ज्‍युनियर बॉक्सिंग स्‍पर्धेत त्‍याने दोन रौप्य पदके पटकाविली आहेत. त्‍याच्‍यातल्‍या या गुणांमुळे त्‍याला बॉक्सिंगमध्‍ये राष्‍ट्रीय स्‍तरावरून चांगली संधी मिळाली आणि प्रशिक्षणासाठी त्‍याला क्‍युबा येथे पाठविण्‍यात आले.

2004 च्‍या अथेन्‍स ऑलम्पिक स्‍पर्धेतही त्‍याने सहभागी घेतला होता. मात्र तेथे त्‍याचे आव्‍हान फार काळ टिकू शकले नाही. 2006 च्‍या राष्‍ट्रकूल स्‍पर्धेत त्‍याने इंग्‍लंडच्‍या नील पर्किग्‍न्‍सचा पराभव केला. मात्र तेथे द. आफ्रिकेच्‍या बोंगानी एम्‍वेल्‍सेसकडून त्‍याला हार पत्‍करावी लागली. 2006 च्‍या आशियायी क्रीडा स्‍पर्धांमध्‍ये 75 किलोपेक्षा कमी वजनगटातही त्‍याने कास्‍य पदक पटकाविले आहे.

बीजिंग ऑलम्पिकमध्‍ये झांबियाच्‍या बाडू जॅकचा 13-2 च्‍या मोठ्या फरकाने पराभव करून त्‍याने आपले आव्‍हान उभे केले. त्‍यानंतर त्‍याने थायलंडच्‍या अंखान चोम्‍फुफुगलाही पराभूत केले. उपउपांत्‍य सामन्‍यात त्‍याने साऊथ पॉच्‍या कार्लोस गोंगोरा याला 9-4 ने पराभूत करून आपले कास्‍य पदक निश्चित केले. भारताला बॉक्सिंगमध्‍ये आजवर मिळालेले हे पहिले कास्‍य पदक ठरले असले तरीही तमाम भारतीयांना त्‍याच्‍याकडून क्‍युबाच्‍या इमिलिओ कोरेआ याला पराभूत करून रौप्य पदक मिळविण्‍याची अपेक्षा होती. मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही.