गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. ऑस्कर
Written By वेबदुनिया|

ब्रिटनमध्ये 'स्लमडॉग' ची धूम

IFM
ऑस्कर नामांकनामुळे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या 'स्लमडॉग मिलियनेयर' या चित्रपटाने ब्रिटेनमध्येही रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले.

अनेक पुरस्कारांचा वर्षाव होत असल्याने ऑस्करचा प्रमुख दावेदार बनलेल्या 'स्लमडॉग' पाहण्यासाठी ब्रिटनमधील चित्रपटगृहांमध्ये रांगाचरांगा लागत आहेत. गेल्या आठवड्यात या चित्रपटाने 23 लाख पाउंडाची कमाई केली. एका महिन्यात झालेले कलेक्शन लक्षात घेतल्यास इतर चित्रपटांना मागे टाकले आहे.

दुस-या महायुध्दावर आधारीत टॉम क्रूजचा 'वाल्किरी' हा चित्रपट दुस-या क्रमांकावर आहे. आणि लियोनार्डो केप्रियोचा 'रिवोल्यूशनरी रोड' हा चित्रपट तिस-या क्रमांकावर आहे.