testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवावी

exam
वेबदुनिया|
WD
आयुष्यातील दहावीचे वर्ष खूप महत्त्वाचे मानले जाते. चांगल्या करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवली पाहिजे. करीयरचे सुनियोजन केल्याने सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थीही उच्च स्थानी पोहचू शकतात. हे विद्यार्थ्यांच्या पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.

विद्यार्थ्याला विविध अभ्यास शाखा उपलब्ध असतात. गुण चांगले आहेत, मात्र कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा? हा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही पडलेला असतो. पण त्यासाठी सगळ्यात आधी विद्यार्थ्याचा स्वतःचा कल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याला कुठल्या विषयात करायचे आहे, हे समजून घ्या. मग त्याविषयीचा विचार करा. त्या दिशेला नोकरीच्या संधी किती उपलब्ध आहेत? त्याचे मन त्या विषयात रमेल काय? याबाबत त्याला सविस्तर मार्गदर्शन केले पाहिजे. त्याचवेळी त्याची त्या विषयातली अभिरूची, योग्यता व क्षमता पाहणेही महत्त्वाचे आहे.
पालकवर्ग विद्यार्थ्यांमधील क्षमता न बघता, त्याच्या इच्छेचा कुठलाही विचार न करता अक्षरश: त्याला त्याच्या मनाविरूध्द शाखेकडे ढकलतात. मुळातच त्याच्या दृष्टीने चुकीचा विषय निवडला जातो. त्यात विशेष प्राविण्य मिळवता न आल्याने त्याच्यात वैफल्य निर्माण होते व तो करीयरच्या पहिल्या पायरीवरच डगमगतो.

कोणते करियर योग्य ठरेल हे तपासण्यासाठी स्वत:चा बुद्ध्यांक मोजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध चाचण्या आहेत. अनेक मानसोपचार तज्ज्ञ या चाचण्या करतात. बुद्ध्यांक अचूक नसला तरी त्याचा मार्गदर्शनासाठी फार उपयोग होऊ शकतो. या प्रकारच्या चाचण्या घेऊन मार्गदर्शन करणार्‍या अनेक संस्था आहेत. साधारणपणे एप्रिल ते जून या महिन्याच्या कालावधीत या चाचण्या घेतल्या जातात.
करीयरची संधी
विविध प्रकारच्या कौशल्यात प्राविण्य मिळवलेल्यांची समाजाला गरज असते. या कौशल्याच्या जोरावर भरपूर पैसा व प्रतिष्ठा मिळवता येते. पालकांनी विद्यार्थ्यांना या बाबी सांगितल्या पाहिजेत. दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना व्यवहारज्ञान तसे फारसे नसतेच. तसेच त्यांना अभ्यास एके अभ्यास या पलीकडे काय असते याची जाणीव नसते. त्यामुळे चांगल्या करीयरची निवड करताना ते गोंधळून जातात. या परिस्थितीत पालकांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. व्यवहाराच्या चार गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजे. त्याच्या चांगल्या करीयरच्या दृष्टीने आपल्या शहरात अथवा शहराबाहेर कुठल्या महाविद्यालयात कोणकोणते अभ्यासक्रम शिकविले जातात याची माहिती काढली पाहिजे.
करीयरची नवी क्षितीजे
जाहिरात शास्त्र, बॅकिंग, ब्युटिशियन, बिझनेस मॅनेजमेंट, सिरॅमिक्स, चार्टर्ड अकाऊंटन्सी, रसायन शास्त्र, सिव्हील सव्हिसेस, विमानतळ व्यवस्था, कंपनी सेक्रटरी, स्थापत्यशास्त्र, हवाई दल, भूदल, नौदल, अर्थशास्त्र, शिक्षणाशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, पत्रकारिता, इंजिनिअरिंग, प्रदूषण नियंत्रण, व्यापारशास्त्र, फॅशन डिझायनिंग, फॅशन जर्नालिझम, मॉडेलिंग, फिल्म बनवणे, फायनान्स मॅनेजमेंट, ह्यूमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट, फार्मसी, नाट्यशास्त्र, जनसंपर्कशास्त्र, प्रकाशन व्यवस्था , लायब्ररी शास्त्र, कायदा, मानसशास्त्र, इव्हेन्ट मॅनेजमेंट, औद्योगिक प्रशिक्षण या सारख्या अनेक नव्या क्षेत्रात करीयरच्या संधी आहेत.


यावर अधिक वाचा :

इंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश

national news
सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...

आयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल

national news
आयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...

सोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ

national news
गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...

स्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

national news
उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...

शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला

national news
बलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...