शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. स्वतःला घडवताना
Written By

घराबाहेर पडण्याआधी

लहानपणापासून बहीण जेव्हा भावाला काही काम सांगते तेव्हा तो म्हणतो स्वत:ची कामे स्वत: करावी. त्यावर बहिणीने हट्ट धरला तर लेक्चर ऐकायला मिळतं असे की तुला आत्मनिर्भर व्हायचं असेल तर तुला स्वत:ला हे करायलाच हवं. आणि खरोखर या गोष्टी तेव्हा आठवतात जेव्हा अभ्यासाच्या वा नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडण्याची वेळ येते. म्हणूनच घराबाहेर पडण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे.

उपकरणेबाबत माहिती: आतापर्यंत गॅसची टाकी बदलणे, बल्ब बदलणे, फ्रीज दुरुस्त करणे, अश्यांतल्या कामात कधी डोकं घातलं नसेल तर ते आता गरजेचं आहे. फारशी नाही तरी थोडी बहुत या सगळ्यांची माहिती असणे आवश्यक आहे.

ड्राइव करणे: आपल्या शहरात कधी बसने तर कधी ऑटोने प्रवास करायची सवय असते. तर कधी भाऊ तर कधी वडील हव्या त्या ठिकाणी सोडून ‍देयचे. पण बाहेर हे विकल्प नसणार म्हणून रात्री बेरात्री परत घरी येण्यासाठी बस किंवा ऑटोची वाट बघण्यापेक्षा स्वत:ला गाडी ड्राइव करता येत असली तर कोणची भी‍ती नसणार.

किड्यांची भीती: पाल, झुरळ किंवा उंदीर बघितल्याबरोबर बेडवर उडी मारून वडिलांना आवाज देणार्‍या मुलींनी आपली ही भी‍ती दूर करायला हवी. कारण घराबाहेर स्वत:लाच कुंचा घेऊन यांच्यामागे धावावे लागणार.

स्वत: ची सुरक्षा: घराबाहेर एकटीने राहणे आणि एकटीने शहरात फिरणे असुरक्षित असू शकतं म्हणून कराटे शिकला असाल तर खूपच छान आहे. याव्यतिरिक्त आपल्या बॅगमध्ये पेपर स्प्रे, चाकू, तिखट पावडर सारख्या वस्तू नेहमी असू द्या.

स्वयंपाक: बाहेर जेवण्यासाठी खूप विकल्प असले तरी घरातील जेवण्याची आठवण झाली तर ती भूख कोणीच भागवू शकतं नाही. म्हणून थोडा बहुत स्वयंपाक येयला हवा. कमीत कमी आपले आवडते दोन-चार पदार्थ तरी शिकायला हरकत नाही.