गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. स्वतःला घडवताना
Written By वेबदुनिया|

प्रेझेंटेशन नेहमी इम्प्रेसिव असावे

ND
राम आणि श्याम हे दोघेही खास मित्र. दोघांचे शिक्षणही सोबतच झाले. दोघांनी एमबीए केले. दोघांचे मार्क्स जवळपास सारखेच होते. दोघेही अभ्यासात हुशार, पण रामच्या पदरी जास्त यश आणि श्यामला त्याच्यापेक्षा थोडे कमी यश मिळाले! याचे कारण म्हणजे राम ज्या कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला गेला तिथे त्याचे सादरीकरण फारच चांगले असायचे. श्यामजवळ पुस्तकी ज्ञान होते, पण रामजवळ पुस्तकी आणि व्यावहारिक ज्ञानही होते.

उच्च शिक्षणामुळे यश नक्कीच मिळते. पण त्याचबरोबर त्याचे सादरीकरणसुद्धा महत्त्वाचे आहे. तुम्हाला भरपूर यश हवे असेल, तर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे :

देहबोलीकडे लक्ष द्या :
सर्वप्रथम आपल्या देहबोलीकडे (बॉडी लँग्वेज) लक्ष द्या. ती नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. आवाजाची स्थिरता व विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे उत्तर स्पष्ट द्या. स्वत:ला अप-टू-डेट ठेवा. मुलाखतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे उत्तर आत्मविश्वासाने द्या. पण अतिआत्मविश्वासाचे प्रदर्शन करू नका. मुलाखत देताना एकावर एक पाय देऊन बसू नका. नख खाणे टाळा. डोळ्याला डोळे भिडवा.

पोशाखाकडे लक्ष द्या :
मुलाखतीत जाताना पोशाख (ड्रेसिंग सेंस) फारच महत्त्वाचा आहे. तुम्ही ज्या पदासाठी मुलाखत देत आहेत त्याला साजेसा ड्रेस घाला. जास्त गडद रंगांचे कपडे घालणे टाळावे. एक्जीक्यूटिव्ह (कार्यकारी) पदासाठी मुलाखत देत असाल तर कॅज्युअल ड्रेस घाला. मोसमाप्रमाणे ड्रेसची निवड करा.

ND
हजरजबाबी बना :
देहबोली व्यक्तीमत्वाबद्दल सांगते. पण त्याहून जास्त महत्तवाचे आहे हजरजबाबीपणा. बोलताना अंग ढिले करणे तुमच्यातील आत्मविश्वासाची कमतरता दर्शवतो. पण त्याची भरपाई तुम्ही तुमच्या हजरजबाबाने पूर्ण करू शकता.

सकारात्मक दृष्टिकोन ठेवा :
सकारात्मक गुण असल्यास व्यक्ती कुठल्याही विपरीत परिस्थितीत स्वत:ला सिद्ध करू शकतो. जे लोक सकारात्मक विचार ठेवून पुढे जातात त्यांना आपले ध्येय जरूर मिळते. पॉझिटिव्ह एटीट्यूड नेहमी नवीन ऊर्जा प्रदान करतो, म्हणूनच कुठलेही काम करताना सकारात्मक विचार ठेवणे जरूरी आहे.

आपले दोष लोकांसमोर दर्शवू नका. नेहमी वातावरण बघून स्वत:ला एडजस्ट करण्याचा प्रयत्न करा. विषयाचे ज्ञान नसल्यास जेवढी माहिती आहे तेवढीच द्यावी.