शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ओळख खेळाडूंची
Written By वेबदुनिया|

जीव मिल्खा सिंग

नाव : जीव मिल्खा सिंग
जन्म : १५ डिसेंबर १९७१
ठिकाण : चंडीगड
देश : भारत
खेळ : गोल्फ

भारताचे नाव गोल्फमध्ये सर्वदूर पसरवणारा खेळाडू म्हणजे जीव मिल्खा सिंग. मिल्खा सिंग या प्रसिध्द धावपटूचा जीव हा मुलगा आहे. गोल्फच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या १०० क्रमांकात असणारा तो पहिला भारतीय गोल्फपटू आहे.

जीवने अबलाइन ख्रिश्चन विद्यापीठाकडून (अमेरिका) खेळताना १९९३ मध्ये एनसीएए डिव्हिजनची गोल्फ स्पर्धा जिंकली. त्यानंतर त्याने अमेरिकेत अनेक हौशी गोल्फ स्पर्धा जिंकल्या. त्यापाठोपाठ त्याने १९९३ मध्ये साऊथन ओक्लाहोमा स्टेट खुली स्पर्धा जिंकली. ही त्याची पहिली व्यवसायिक स्पर्धा होती.

१९९७ मध्ये तो युरोपियन टूरच्या पात्रता फेरीत सातव्या स्थानावर आला व युरोपीयन टूरला पात्र ठरला. १९९९ मध्ये तो पन्नासाव्या कमांकावर आला होता.

मध्यंतरीच्या काळात त्याला दुखापतींनी घेरले होते. पण त्याच्यावर मात करत त्याने २००६ मध्ये वोल्व्हो चायना खुली स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला. (त्याआधी ही स्पर्धा अर्जुन आटवल यांनी जिंकली होती.) या विजयामुळे जीवने २००६ च्या हंगामात 16 व्या क्रमांकापर्यंत मजल मारली.

पुरस्कार
२००६ : पंजाब गोल्फ असोसिएशनचा गोल्फर पुरस्कार