गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ओळख खेळाडूंची
Written By वेबदुनिया|

धनराज पिल्ले

नाव : धनराज पिल्ले
जन्म : १६ जुलै १९६८
ठिकाण : पुणे
देश : भारत
खेळ : हॉकी
पदार्पण : 1989

सामान्य कुटुंबात जन्मलेला व आपल्या जिद्दीच्या व कौशल्याच्या जोरावर भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदापर्यंत मजल मारलेला जिगरबाज खेळाडू म्हणजे धनराज पिल्ले. आघाडीवर खेळणार्‍या धनराजने आतापर्यंत चारशेहून जास्त सामने खेळले असून दोनशेच्या आसपास गोल केले आहेत.

भारताकडून सर्वांत जास्त गोल करणार तो खेळाडू आहे. तो एकटाच असा भारतीय आहे की त्याने चार ऑलिम्पिक, चार जागतिक हॉकी करंडक, चार चॅम्पियन्स चषक व चार आशियाई स्पर्धेत भाग घेतला आहे. २००२ मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणार्‍या संघाचा तो कर्णधार होता. तो सध्या इंडियन एअरलाइनमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहे.

धनराज पिल्ले आतापर्यंत इंडियन जिमखाना, एफ सी लॉन, सिलंगूर अभाहानी लि., स्तुतघर, बँक सिंपानाम नासियोनाल, आर्थर अडरसन सिंगापूर अशा वेगवेगळ्या जागतिक क्लबकडून खेळला आहे.

पुरस्कार
१९९५ : अर्जुन पुरस्कार
१९९८-९९ : के. के. बिर्ला पुरस्कार
१९९९ : राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
२००० : पद्मश्री.