testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पनीरची भाजी

paneer sabji
वेबदुनिया|
साहित्य : दूध, मैदा किंवा डाळीचे पीठ, ओल्या मिरच्या किंवा लाल तिखट, मीठ कांदा, लसूण, आले, धने, जिरे, लिंबू, साखर, तेल.
कृती : पनीर तयार करून घेतल्यावर त्यात मैदा किंवा डाळीचे पीठ घालून, सारखे करून एका फडक्यावर अर्धा इंच जाडीचे पसरावे. त्यावर दुसरे एक फडके घालावे व त्यावर पाट ठेवावा. अंदाजे अर्ध्या तासाने त्यातील सर्व पाणी निघून जाईल. नंतर त्या पनीरच्या चौकोनी वड्या कापून, त्या तेलात किंवा तुपात तांबूस तळून घ्याव्यात. नंतर फोडणी करून घ्यावी, कांदा, लसूण, ओल्या मिरच्या, धने व जिरे-सर्व एकत्र वाटून, फोडणीत घालून, थोडे परतावे व दोन वाट्या पाणी त्यात घालून, चवीप्रमाणे मीठ व साखर घालावी. थोडे लिंबू पिळावे व त्यानंतर त्यात पनीराचे तुकडे घालून चांगले उकळावे.


यावर अधिक वाचा :