शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

काबूली पालक

साहित्य : दोन वाट्या काबुली चणे, एक कांदा, दोन टोमॅटो, दोन कप उकडून बारीक केलेला पालक, पाव लहान चमचा हळदपूड, अर्धा लहान चमचा लाल तिखट, अर्धा लहान चमचा गरम मसाला, अर्धा लहान चमचा मीठ, दोन लाल सुक्या मिरच्या, दोन चमचे तेल, एक इंच आल्याचा तुकडा. 

कृती : मीठ टाकून चणे उकडून घ्या, त्यानंतर कढईत एक चमचा तेल टाकून त्यात कांदा टोमॅटो व पालक व्यवस्थित परतून घ्या, मसाला मिसळून शिजू द्या, त्यात आल्याची पेस्ट करून टाका, नंतर त्यात उकडलेले चणे टाकून शिजू द्या, उरलेल्या तेलात सुकी मिरची टाकून कडकडीत गरम करा व काबुली पालकाला वरुन फोडणी द्या. यात फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात आहे.