शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

पंजाबी कढी

साहित्य : 100 ग्रॅम फूलकोबी, 250 ग्रॅम हिरवे मटर, 2 बटाटे, 50 ग्रॅम अरबी, 50 दुधी भोपळा, 8-10 फ्रेंचबिन्स शेंगा, 5-6 हिरव्या मिरच्या, 2 टोमॅटो, 25 ग्रॅम चिंच, अर्धा कप बेसन, दोन मोठे चमचे तूप. 

कृती : सर्व भाज्यांना कापून एकीकडे ठेवावे. कढईत एक पळी तूप गरम करून पाव चमचा मेथी, एक चमचा जिरे व पाव चमचा मोहरीची फोडणी द्यावी. बेसन घालून गुलाबी होईपर्यंत भाजावे. दोन चमचे धने, एक चमचा मिरची, एक चमचा हळद, दीड चमचा मीठ व चार ग्लास पाणी टाका. आता कढईत सर्व भाज्या टाकून 5-6 मिनिटापर्यंत भाजावे.

भाजल्यानंतर भाज्या कुकरमध्ये टाकून दोन शिट्टी होईपर्यंत आंचेवर ठेवावे. शिट्टी आल्यानंतर चिंचेचे पाणी टाकावे. वाढताना लाल मिरची, हिरवी मिरची, जिरे व हिंगाची फोडणी द्यावी आणि वरून थोडेसे धने टाकावे. याला भात किंवा पोळीसोबत घ्यावे.