शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

पंजाबी ढाबा : छोले

साहित्य : अर्धा किलो काबुली चणे, चार बटाटे, चार टोमॅटो, अर्धा चमचा जिरे, एक इंच आल्याचा तुकडा, दालचिनीचे तीन तुकडे, दहा-बारा मिरे, मसाल्याची वेलची, एक लसणीचा गड्डा, सोडा अर्धा चमचा, सुक्या लाल मिरच्या, तूप एक वाटी.
 
कृती : रात्री पाण्यात सोडा घालून, त्यात काबुली चणे भिजत घालावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी बटाटे उकडून, सोलून, त्यांच्या फोडी कराव्यात. मिरे, दालचिनी, जिरे, मसाल्याची वेलची यांची पूड करून ती पूड व आले, लसूण, मिरच्या असे सर्व साहित्य बेताचे पाणी घालून वाटून घ्यावे. हा वाटलेला गोळा तुपावर खमंग परतावा. आदल्या रात्री भिजत घातलेले चणे त्यात- म्हणजे चणे भिजत घातलेल्या - पाण्यात मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावेत व त्यात वरील वाटलेला गोळा व बटाट्याच्या फोडी घालाव्यात. टोमॅटोच्या फोडी करून घालाव्यात. नंतर पुन्हा चांगले शिजवावे. टोमॅटो न घातल्यास अनारदाणे घालावेत. छोल्यात गूळ घालू नये.