गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

व्हेज हरियाली

ND
सामग्री - फुलकोबी- 1कप, फ्रेंचबीन्स 1 कप, हिरवे मटर 3 वाट्या, गाजर 1/2 कप, पानकोबी - 1 कप, पालक 4 कप, आलं-लसूण पेस्ट 4 टी स्पून, काजू 10-12, खवा 1/2 वाटी. दुधावरील मलई 1/2 वाटी, मैदा 1/2 कप, कॉर्न फ्लोअर 1/2 कप, पनीर (किसलेला) 1/2 कप, हिरव्या मिरच्या -4, मीठ, तेल तळण्यासाठी, 1 मध्यम कांद्याचा कीस.

कृती : वरील दिलेल्या सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात व अर्ध्या-अर्ध्या करून घ्यावा. कोफ्ते तयार करताना अर्धा काढलेल्या भाज्यांमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ मिसळावे. वाटाणे मिक्सरमधून दळून घ्यावे व अर्धा भाग कोफ्त्यांमध्ये मिसळावा. किसलेला पनीर यात मिसळून घेतल्यानंतर वरील मिश्रणात मिसळून छोटे छोटे बॉल्स करून तळून घ्यावे. पनीरमुळे बॉल्स अधिक स्पंजी होतात. कोफ्ते तळून वेगळे ठेवावे. ग्रेव्ही तयार करताना प्रथम 1/2 वाटी तेल गरम करून त्यात लसूण-आले पेस्ट व किसलेला कांदा लालसर होतपर्यंत फ्राय करून घ्यावा. यात उरलेल्या अर्ध्या भाज्या टाकून व मटर पेस्ट टाकून व्यवस्थित मॅश करून घ्यावे. यात वाफलेला पालक टाकून मॅश करावे.

खवा परतून घ्यावा व मॅश केलेल्या भाज्यांमध्ये खवा व मलाई घालनू शिजवावे. हिरवी मिरची पेस्ट टाकावी व खदखदून शिजवावे. यात कुठलाही मसाला वापरू नये. केवळ चवीप्रमाणे मीठ घालावे. गॅस बंद करून कोफ्ते मिसळावेत. वर सजवण्यासाठी किसलेला पनीर घालावा.