शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. रेल्वे बजेट 09
Written By वेबदुनिया|

बजेट अगदी जसाचा तसा

अध्यक्ष महाशय,

आज मी भारतीय रेल्‍वेच्‍या वर्ष 2008-09 साठी संशोधित, अनुमानित आणि 2009-10 साठीचा अंदाजित लेखानुदान विवरण सभागृहासमोर सादर करीत आहे.

अध्‍यक्ष महाशय

शुक्रिया से मैं शुरू करता हूँ अपनी बात आज,
साथ लेकर मैं चला हूँ देश, दुनिया और समाज,
मैं चुकाता ही रहूँगा देश की मिट्टी का कर्ज,
राष्ट्र सेवा रीत मेरी और यही मेरा रिवाज

राष्‍ट्र सेवेच्‍या प्रवासात रेल्‍वेने महत्‍वाचा टप्‍पा माझ्या कारकिर्दीत पार पाडला याबद्दल मला अभिमान वाटतो. सर्वसामान्‍य माणसावर कोणताही बोजा न टाकता रेल्‍वेला दरवर्षी नव्‍या शिखरावर पोचविण्‍यासाठी माझा प्रयत्‍न राहिला आहे. पाच वर्षाच्‍या माझ्या काळात रेल्‍वे प्रथमच 90 हजार कोटींचा नफा कमवण्‍याच्‍या दिशेने अग्रेसर झाली आहे. 2001 मध्‍ये ज्‍या रेल्‍वे विभागाकडे आपल्‍या जर्जर गाड्यांना व त्‍यांच्‍या भागांना बदलण्‍यासाठीही पैसे नव्‍हते. आज त्‍याच रेल्‍वेने आपल्‍या ऐतिहासिक वित्तीय कायाकल्पाने संपूर्ण जगाला आश्‍चर्यचकीत केले आहे.

महोदय, नव्वदच्‍या दशकात साधारणतः तीन टक्के वार्षिक दराने प्रगती करणा-या रेल्‍वेने गेल्‍या पाच वर्षात सुमारे आठ टक्‍क्‍यांच्‍या वार्षिक दराने आपल्‍या फ्रेट लोडिंगमध्‍ये वाढ करण्‍यात यश मिळविले आहे. इतकेच नव्‍हे तर सिमेंट व स्टीलच्‍या वाहतुकीतही अनेक वर्षांपासून होत असलेल्‍या घसरणीला थांबवून त्‍यात अमुलाग्र बदल घडविण्‍यात यश मिळविले आहे.

कारीगरी का ऐसा तरीका बता दिया,
घाटे का जो भी दौर था बीता बना दिया,
भारत की रेल विश्व में इस तरह की बुलंद,
हाथी को चुस्त कर दिया, चीता बना दिया



या बदलाचा फायदा केवळ रेल्‍वे आणि रेल्‍वेकर्मचा-यांनाच झाला नाही तर देशाच्‍या जनतेलाही त्‍याचा लाभ झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्‍वे आपल्‍या ग्राहकांना पहिल्‍यापेक्षा अधिक चांगली सुविधा देण्‍यात यश मिळविले आहे. गेल्‍या पाच वर्षांत रेल्‍वेच्‍या अपघातांची संख्‍याही कमी झाली आहे. 2003-04 मध्‍ये 325 अपघाताच्‍या घटना घडल्‍या होत्या हे प्रमाण वर्ष 2007-08 मध्‍ये 194 पर्यंत आले आहे. या वर्षी एप्रिल ते नोव्‍हेंबर दरम्‍यान 117 झाली आहे.

रेल्‍वेने ग्राहकांच्‍या गरजा पूर्ण करा आणि त्‍यांची मने जिंका हे सुत्र आता आत्‍मसात केले आहे. रेल्‍वेत काम करणारे कर्मचारी व अधिकारी आजही तेच आहेत मात्र त्‍यांच्‍या कामात आणि विचारसरणीत बदल झाला आहे. त्‍यामुळेच हे शक्‍य झाले. आता ग्राहकांना घर बसल्‍या इंटरनेटवरून रेल्‍वे तिकीट आरक्षण करता येते. या शिवाय एटीएम, पेट्रोल पंप व पोस्‍ट ऑफीसमधूनही रेल्‍वे रिझर्वेशन करता येते. आता '139 ट्रेन इंक्वायरी सेवा' झाल्‍याने घर बसल्‍या रेल्‍वेची इत्‍यंभूत माहिती उपलब्‍ध झाली आहे. देशाच्‍या चार भागांमध्‍ये चार कॉल सेंटर कार्यरत आहेत. सध्‍या देशात पाच लाखांपेक्षाही अधिक प्रवासी याचा लाभ घेत आहेत.

रेल्‍वेकडून पाच वर्षात 4 हजार 900 किलोमीटरचे रेल्‍वे रूळ बदल, 1 हजार 800 किलोमीटरचे दुहेरीकरण आणि 1 हजार 100 किलोमीटर नव्‍या रेल्‍वे लाईन टाकण्‍यात आल्‍या आहेत.

स्‍वातंत्र्यानंतर प्रथमच इशान्‍येकडील राज्‍यांमध्‍ये रेल्‍वे सुविधा सुरू करण्‍यात आम्‍हाला यश आले आहे. तर काश्मीर खो-यातही रेल्‍वे पोचविण्‍यात यश आले आहे. अनंतनाग ते राजवंशर दरम्‍यान सेल्‍वे सेवा सुरू करण्‍यात यश आले आहे. येत्‍या काही दिवसात ही सेवा बारामुला आणि त्‍यानंतर काजीकुंडपर्यंत जाणार आहे.

रेल्‍वे विद्युतीकरणाचे कामही पूर्ण झाले असून वर्ष 2003-04 च्‍या 504 रूट किलोमीटरचया जागी 2008-09 मध्‍ये एक हजार रूट किलोमीटरचे विद्युतीकरणाचे उद्दीष्‍ट आहे. विद्युत मार्गांवर डबल स्टेक कंटेनर ट्रेन चालविण्‍याचाही आमचा प्रयत्‍न असून सुमारे साडे सात मीटर ऊंच ओएचईवर विद्युत रेल्‍वे इंजिन चालविण्‍याची यशस्‍वी चाचणी केली गेली आहे. यामुळे विद्युतीकृत पश्चिमी डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोरवर डबल स्टेक कंटेनर ट्रेन चालविली जाणार आहे.

याच प्रकारे वॅगन उत्पादन दरवर्षी 6 हजार 600 ने वाढून सुमारे 15 हजार (व्हीकल यूनिट) आणि डीजल व वीज निर्मिती उत्पादन 202 ने वाढून सुमारे 480 करण्‍याचे उद्दीष्‍ट आहे. नव्‍या डिजाइनचे बंद व खुल्‍या वॅगन्‍सचे उत्पादन सुरू झाले आहे. यामुळे बंद वॅगन्‍सवाल्‍या मालगाड़ीची क्षमता जुन्‍या मालगाडीच्‍या तुलनेत 78 टक्‍के अधिक असणार आहे. यात आता 2 हजार 300 टन ऐवजी 4 हजार 100 टन माल वाहतूक करणे शक्य होणार आहे. प्रवासी गाड्यांची क्षमताही वाढविण्‍यात आली आहे.

हर शिखर को पार करते नित नई मंजिल की ओर,
प्रगति का काफ़िला बढ़ने लगा है चारों ओर ,
राह के हर शख्स को लेकर चले हैं साथ हम,
एक नए अंदाज़ से फिर एक नई मंजिल की ओर

महोदय, आता मी गेल्‍या आर्थिक वर्ष 2007-08 मधील राबविण्‍यात आलेल्‍या योजनांबद्दल माहिती देऊ इच्छितो. रेल्‍वेने या वर्षात 9 टक्‍क्‍यांचा विकास दर साध्‍य करीत 794 मिलियन टन माल वाहतूक केली आहे. माल आणि प्रवासी वाहतुकीतून क्रमशः 14 व 15 टक्क्‍यांची वाढ झाली आहे. एकूण वाहतुकीपासूनच उत्‍पन्‍नही 71 हजार 645 कोटी रुपये झाले आहे.


संशोधित लेखानुदान 2008-09

2008-09 मध्‍ये सप्‍टेंबरपर्यंत रेल्‍वेने माल वाहतुकीपासूनच्या उत्‍पन्‍नात जोरदार वाढ केली आहे. डिसेंबर 2008 च्‍या अखेरीपर्यंत माल वाहतुकीतून 14 टक्‍क्‍यांची प्रगती शक्य असून हे उत्पन्‍न 38 हजार 93 कोटी रुपये होईल. वर्ष 2008-09 साठीचे आमचे उद्दीष्‍ट 1 हजार 593 कोटी इतके आहे. याच प्रकारे डिसेंबरच्‍या अखेरीपर्यंत प्रवासी वाहतुकीत 12 टक्के वाढ झाली आहे. उद्दीष्‍टांपेक्षा ही वाढ 3 टक्के अधिक आहे. त्‍यानुसार, माल वाहतुकीतून 54 हजार 293 कोटी रुपये, प्रवासी वाहतुकीतून उत्‍पन्‍न 22 हजार 330 कोटी रुपये इतर मार्गातून येणारे उत्पन्न 3 हजार 250 कोटी रुपये इतर कोचिंग उत्‍पन्न 2 हजार 420 कोटी रुपये आणि सकल वाहतूक मिळकत 82 हजार 393 कोटी रुपये निश्चित करण्‍यात आली आहे.

सहाव्‍या केंद्रीय वेतन आयोगाच्‍या सिफारशी करून 14 लाख रेल्‍वे कर्मचारी व 11 लाख पेंशनर्सना लाभ मिळवून दिला आहे. सहाव्‍या वेतन आयोगाच्‍या सिफारशी लागू करण्‍यासाठी वेतन वाटप पध्‍दतीत चार हजार कोटी आणि पेन्‍शन निधित एक हजार कोटी रुपयांची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात वेतन वाटप पध्‍दतीवर 9 हजार कोटी तर पेन्‍शनवर 4 हजार 500 कोटींचा खर्च होण्‍याची शक्‍यता आहे.

2009-10 साठी अंदाजित बजे

वर्ष 2009-10 साठी मालन वाहतूक, प्रवासी वाहतूक, व अन्‍य मार्गातून क्रमशः 59 हजार 59 कोटी, 25 हजार कोटी, 6 हजार कोटी आणि 3 हजार कोटी रुपये उद्दीष्‍ट ठेवण्‍यात आले आहे. तर वाहतुकीतून उत्‍पन्नाचे उद्दीष्‍ट 93 हजार 159 कोटी ठेवण्‍यात आले आहे. सध्‍याच्‍या उद्दीष्‍टापेक्षा ते 10 हजार 766 कोटी रुपये अधिक आहे.

वर्ष 2009-10 साठी सामान्य संचालन खर्च 62 हजार 900 कोटी रुपये निश्चित करण्‍यात आले आहे. 2008-09 च्‍या तुलनेत ते 7 हजार 900 कोटी रुपये अधिक आहे. सहाव्‍या वेतन आयोगामुळे त्‍यात वाढ झाली आहे. एकूण खर्च 83 हजार 600 कोटींपर्यत शक्‍य आहे.

वार्षिक योजना 2009-10

वर्ष 2009-10 साठी वार्षिक योजनेत 37 हजार 905 कोटींच्‍या गुंतवणुकीचा प्रस्‍ताव आहे. सामान्य करातून मिळणारे उत्‍पन्न 9 हजार 600 कोटी प्रस्तावित आहे. त्‍यात केंद्रीय रस्‍ता निधी तून दिली जाणारी 1 हजार 200 कोटींची रक्कम समाविष्‍ट नाही.

देशातील वेगवेगळ्या भागात आवश्‍यकतेनुसार बुलेट ट्रेनसाठी प्री-फीजिबिलिटी स्टडी केली गेली असून दिल्ली-अमृतसर, अहमदाबाद-मुंबई-पुणे, हैदराबाद-विजयवाड़ा-चेन्नई, चेन्नई-बंगळूरू-एर्नाकुलम आणि हावड़ा-हल्दिया दरम्‍यान बुलेट ट्रेन चालविण्‍यासाठी प्री- फीजिबिलिटी स्टडी करण्‍यासाठीही प्रयत्‍न सुरू आहेत. त्‍यापैकी दिल्ली-पाटणा दरम्‍यान बुलेट ट्रेन सुरू करण्‍यासाठी प्री- फीजिबिलिटी स्टडी करण्‍याची कारवाई लवकरच सुरू केली जाईल.

छपरा येथे रेल्‍वे चाकांच्‍या निर्मितीचा कारखाना उभारला जात असून याच महिन्‍यात मढोरा येथे डीझेल आणि मधेपुरा येथे इलेक्ट्रिक इंजिन कारखाना उभारला जाणार आहे.

भारत वॅगन लिमिटेडची मोकामा व मुजफ्फरपूर येथील कारखाने रेल्‍वे मंत्रालयाकडे स्थानांतरित करण्‍यात आले आहेत.

झारग्राममध्‍ये पुरुलिया दरम्‍यानचे रूट आणि कोलकाता मेट्रोचा दमम ते दक्षिणेश्वरपर्यंतच्‍या विस्तारासाठीही सर्व्‍हे पूर्ण झाला आहे. यासाठी प.बंगाल सरकार पन्‍नास टक्के निधी खर्च करणार आहे.

गुजरातच्‍या भरूच आणि सूरत जिल्‍ह्यात पलेज, पानौली, कोसांबा आणि किम, दिल्ली क्षेत्रात रोशनआरा गार्डन व सुल्तानपूरी, पंजाबच्‍या लुधियाना येथील शास्त्रीनगर व मॉडल टाउन आणि तामिळनाडूत वासरपाड़ी येथे पन्‍नास टक्के भागिदारीवर उभारणीसाठी प्रयत्‍न सुरू आहेत.

भागलपूर व ठाण्‍यात रेल्‍वेच्‍या नवीन विभागांची उभारणी करण्‍याचाही आमचा प्रयत्‍न आहे.


नवीन रेल्‍वे मार्

1. रिंगस- डीडवाना व्‍हाया खाटू श्यामजी
2. इस्लामपुर- मानपुर व्‍हाया खिज्रसराय/ सरबहदा
3. बाकुला- बेलथरा रोड
4. बिहारीगंज- फोर्बिसगंज व्‍हाया मुरलीगंज, कुमारखंड, छातापुर
5. पिडुगुराला-नरसारावपेट
6. मधेपुरा-वीरपुर व्‍हाया सिंहेस्वर, पिपरा, त्रिवेणीगंज
7. बोटाड-जसनन व्‍हाया गोंडल
8. बिहारीगंज- नौगछिया व्‍हाया उदाकिशुनगंज, पुरैनी, चौसा
9. समदड़ी- फलोदी
10. बुढ़वल- बहराइच
11. अरेराज-नरकटिया गंज व्‍हाया लौरिया
12. लालगंज- फैजाबाद व्‍हाया अकबरगंज, महाराजगंज, रायबरेली
13. पारसनाथ- मधुबन
14. ढेंग- सोनबरसा व्‍हाया मेजरगंज, कन्हौली

दुहेरीकर

1. हासपेट- स्वामीहल्ली
2. तोरणगल्लू- रंजीतपुरा
3. बांदीकुई- अलवर
4. अजमेर- पालनपुर
5. तिनपहाड़- भागलपुर
6. आनंद विहार- तिलक ब्रिज तीसरी व चौथी लाइन
7. डंगुआपोसी- पेन्ड्रासली तीसरी लाइन
8. कटवा- फरक्का

प्रवासी सुविध

प्रवाशांच्‍या मागणीवरून खालील गाड्यांच्‍या फे-या वाढवून सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍या जाणार आहेत.

1. बिलासपुर-तिरुनेलवेलि एक्सप्रेस व्‍हाया तिरुवनन्तपुरम साप्ताहिक
2. रांची-जयनगर एक्सप्रेस आठवड्यात तीन दिवस
3. सिकंदराबाद-मानुगुरु सुपरफास्ट रोज
4. मुंबई-कारवार सुपरफास्ट तीन दिवस
5. भोपाल-लखनऊ जंक्शन गरीब रथ एक्सप्रेस साप्ताहिक
6. दुर्ग-जयपुर एक्सप्रेस साप्ताहिक
7. कोल्हापुर-धनबाद लिंक सर्विस व्‍हाया पारसनाथ साप्ताहिक
8. सेनगोटाई-ईरोड पॅसेंजर रोज
9. डिब्रूगढ़ टाऊन-चंदीगड एक्सप्रेस साप्ताहिक
10. अजमेर-भागलपुर व्‍हाया दिल्ली गरीब रथ एक्सप्रेस दोन दिवस
11. निजामुद्दीन-बंगलोर व्‍हाया कछेगुडा राजधानी एक्सप्रेस तीन दिवस
12.बरौनी-दिल्ली जनसाधारण सुपरफास्ट दोन दिवस
13. मुंबई-वाराणसी सुपरफास्ट रोज
14. म्‍हैसूर- यशवंतपूर सुपरफास्ट रोज
15. जमालपूर-गया एक्सप्रेस रोज
16. कोरापुट-राउरकेला एक्सप्रेस व्‍हाया रायगड रोज
17. आगरा-अजमेर सुपरफास्ट रोज
18. सीतामढ़ी-पटना लिंक सर्विस रोज
19. त्रिचुरापल्ली-मदुराई एक्सप्रेस रोज
20. मुंबई-बीकानेर सुपरफास्ट दोन दिवस
21. जयनगर-अजमेर लिंक सर्विस दोन दिवस
22.आगरा-लखनऊ जंक्शन शताब्दी एक्सप्रेस रोज
23. गांधीधाम-कोलकाता सुपरफास्ट साप्ताहिक
24. नई-दिल्ली-गुवाहाटी राजधानी एक्सप्रेस वाया भागलपुर साप्ताहिक
25. मुंबई-तिरुनेलवलि सुपरफास्ट व्‍हाया तिरुवन्न्तपुरम दोन दिवस
26. जम्मूतवी-दरभंगा गरीब रथ एक्सप्रेस साप्ताहिक
27. सहरसा-दिल्ली एक्सप्रेस व्‍हाया पटना साप्ताहिक
28. ग्वालियर-भोपाल इंटरसिटी एक्सप्रेस व्‍हाया गुना पाच दिवस
29. कोयम्बटूर-तुतीकोरीन लिंक सर्विस रोज
30. हावडा-हरिद्वार सुपरफास्ट पाच दिवस
31. मछलीपट्टनम-मुंबई सुपरफास्ट दोन दिवस
32. वाराणसी-जम्मूतवी सुपरफास्ट रोज
33. गोरखपुर-मुंबई सुपरफास्ट रोज
34. झाझा-पटना मेमू
35. नई-दिल्ली-पलवल मेमू
36. नई दिल्ली-गुवाहाटी राजधानी एक्सप्रेस व्‍हाया मुजफ्फरपुर साप्ताहिक
37. वेरावल-मुंबई लिंक सर्विस रोज
38.रांची-पटना जनशताब्दी रोज
39.झांसी-छिंदवाडा सुपरफास्ट दोन दिवस
40. मुंबई-जोधपुर एक्सप्रेस साप्ताहिक
41. हाजीपुर-बगहा लिंक सर्विस
42.हावडा-दिल्ली लिंक सर्विस वाया अजीमगंज-भागलपुर साप्ताहिक
43.सीतामढी-दिल्ली गरीब रथ एक्सप्रेस व्‍हाया पाटणा साप्ताहिक

गाड्यांच्‍या मार्गांचा विस्‍तार

1. 5761/5762 रांची-अलीपरुद्वार एक्सप्रेस गुवाहाटीपर्यंत
2. 9269/9270 पोरबंदर-बापूधाम मोतिहारी एक्सप्रेस मुज्जफरपूरपर्यंत
3. 1471/1472 जबलपुर-भोपाल एक्सप्रेस लक्ष्मीबाई नगर, इंदूरपर्यंत
4. 6865/6866 अर्नाकुलम-त्रिचुरापल्ली एक्सप्रेस नागौरपर्यंत
5. 3155/3156 कोलकाता-दरभंगा मिथिलांचल एक्सप्रेस सीतामढ़ीपर्यंत
6. 2175/2176 हावड़ा-ग्वालियर चम्बल एक्सप्रेस मथुरापर्यंत
7. 2177/2178 हावड़ा-आगरा कॅन्‍ट चंबळ एक्सप्रेस मथुरापर्यंत
8. 6507/6508 जोधपुर-बंगलोर एक्सप्रेस कोईमबत्तूरपर्यंत
9. 2187/2188 जबलपुर-मुंबई गरीब रथ एक्सप्रेस अलाहाबादपर्यंत
10. 2927/2928 मुंबई-वड़ोदरा एक्सप्रेस छोटापूर उदयपूरपर्यंत
11. 541/542 पटना-दरभंगा कमला गंगा फास्ट पॅसेंजर बिरोलपर्यंत
12. 3113/3114 कोलकाता-मुर्शिदाबाद हजार दुआरी एक्सप्रेस लालगोलापर्यंत
13. 2909/2910 मुंबई-जयपुर गरीब-रथ दिल्लीपर्यंत
14. 2143/2144 नागपुर-गया दीक्षाभूमी पारसनाथ एक्सप्रेस धनबादपर्यंत व्‍हाया पारसनाथ

खालील गाड्यांच्‍या फे-या वाढविण्‍याचे नियोजन आहे

1. 2423/2424 नवी दिल्ली-गुवाहाटी/डिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस (6 दिवस)
2. 2433/2444 भुवनेश्‍वर-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस (4 दिवस)
3. 2395/2396 अजमेर-राजेंद्रनगर जियारत एक्सप्रेस (2 दिवस)
4. 2211/2212 निजामुद्दीन-बापूधाम मोतिहारी गरीबरथ एक्सप्रेस (2 दिवस)
5. 2183/2184 भोपाल-लखनऊ जंक्शन एक्सप्रेस (3 दिवस)
6. 7091/7092 सिकंदराबाद- पाटणा एक्सप्रेस (रोज)
7. 2739/2740 सिकंदराबाद-विशाखापट्टणम गरीबरथ एक्सप्रेस (रोज)
8. 2111/2112 अमरावती-मुंबई अमरावती एक्सप्रेस (रोज)
9. 2149/2150 पुणे-पाटणा एक्सप्रेस (रोज)
10. 2957/2958 अहमदाबाद-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस (रोज)
11. 2947/2948 अहमदाबाद-पाटणा अजीमाबाद एक्सप्रेस (3 दिवस)
12. 2887/2888 पुरी-हावड़ा एक्सप्रेस (2 दिवस)
13. 2487/2488 जोगबनी-दिल्ली सीमांचल एक्सप्रेस (6 दिवस)
14. 2823-2824 निजामुद्दीन-दुर्ग छत्तीसगड संपर्क क्रांती (3 दिवस)