शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By

रक्षाबंधनच्या दिवशी पूजेच्या थाळीत असायला पाहिजे या 7 गोष्टी

भाऊ आणि बहिणीसाठी रक्षाबंधन (26 ऑगस्ट, रविवार) एक महापर्वाप्रमाणे असतो. या दिवशी सर्व बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात. राखी बांधण्याअगोदर एक विशेष थाळी  सजवली जाते. या ताटात कोण कोणत्या 7 खास वस्तू असायला पाहिजे, येथे जाणून घ्या ...

1. कुंकू  
कुठल्याही शुभ कामाची सुरुवात कुंकुपासून सुरू होते. ही प्रथा फार जुनी आहे आणि याचे पालन आजही करण्यात येत आहे. तिलक मान-सन्मानाचा प्रतीक आहे. बहीण तिलक लावून भावाप्रती आदर दाखवते. तसेच, आपल्या भावाच्या कपाळावर तिलक लावून  बहीण त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. म्हणून पूजेच्या ताटात कुंकू ठेवणे आवश्यक आहे. 
2. तांदूळ (अक्षता
तिलक लावण्यानंतर त्यावर अक्षता लावले जातात. तांदुळाला अक्षता म्हटले जाते. याचा अक्षता अर्थात जो पूर्ण नसेल. तिलकावर  अक्षता लावण्याचा अर्थ असा आहे की भावाच्या जीवनावर तिलकाचा शुभ प्रभाव बनून राहायला पाहिजे. तांदूळ शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे जीवनात भौतिक सुख-सुविधांची प्राप्ती होती.

3. नारळ  
आपल्या भावाला बहीण तिलक लावल्यानंतर हातात नारळ दिले देते. नारळाला श्रीफलही म्हणतात. श्री अर्थात देवी लक्ष्मीचे फळ. हे  सुख-समृद्धीचे प्रतीक आहे. बहीण भावाला नारळ देऊन ही कामना करते की भावाच्या जीवनात सुख आणि समृद्धी नेहमी टिकून राहवी आणि त्याची प्रगती व्हायला पाहिजे.

4. रक्षा सूत्र (राखी)
रक्षा सूत्र बांधल्याने त्रिदोष शांत होतात. त्रिदोष अर्थात वात, पित्त आणि कफ. आमच्या शरीरात कुठलेही आजार या तीन दोषांमुळे होतात.  रक्षा सूत्र मनगटावर बांधल्याने शरीरात या तिघांचा संतुलन बनून राहतो. हे दोरे बांधल्याने मनगटाच्या नसांवर दाब पडतो, ज्याने तिन्ही दोष नियंत्रात राहतात. रक्षा सूत्राचा अर्थ आहे, तो सूत्र (दोरा) जो आमच्या शरीराची रक्षा करतो. राखी बांधण्याचा एक मनोवैज्ञानिक पक्ष देखील आहे. बहीण राखी बांधून आपल्या भावाकडून जन्मभर रक्षा करण्याचा वचन घेते. भावाला देखील हा रक्षासूत्र या गोष्टीची जाणीव करून देतो की त्याला नेहमी बहिणीची रक्षा करायची आहे.  

5. मिठाई
राखी बांधल्यानंतर बहीण आपल्या भावाला मिठाई खाऊ घालून त्याचे तोंड गोड करते. मिठाई खाऊ घालणे या गोष्टीचे प्रतीक आहे की बहीण आणि भावाच्या नात्यात कधीही दुरावा निर्माण न व्हावा, मिठाई प्रमाणे नेहमी त्यांच्या जीवनात गोडवा राहावा. 

6. दिवा  
राखी बांधल्यानंतर बहीण दिवा लावून भावाची आरती ओवाळती. या नात्यात अशी मान्यता आहे की आरती ओवाळताना सर्व प्रकारच्या वाईट दृष्टींपासून भावाची रक्षा होते. आरती ओवाळून बहीण कामना करते की भाऊ नेहमी स्वस्थ आणि सुखी राहावा.  
 

7. पाण्याने भरलेला कलश  
राखीच्या थाळीत पाण्याने भरलेला एक कलश देखील ठेवण्यात येतो. कलशातील पाणी घेऊन कुंकू मिसळून तिलक तयार केले जाते. प्रत्येक शुभ कामाच्या सुरुवातीत पाण्याने भरलेला कलश ठेवला जातो. अशी मान्यता आहे की या कलशामध्ये सर्व पवित्र तीर्थ आणि देवी देवतांचा वास असतो. या कलशच्या प्रभावामुळे भाऊ आणि बहिणीच्या जीवनात सुख आणि प्रेम सदैव कायम राहतो.