शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By वेबदुनिया|

कहाणी रक्षाबंधनाची!

रक्षाबंधनाशी अनेक कथा जोडलेल्या आहेत. परंतु, आपण येथे काही महत्त्वाच्याच कथा पाहणार आहोत. यापैकी पहिल्या कथेला धार्मिक महत्त्व आहे. बाकीच्या सर्व कथा बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक व या सणाच्या महत्त्वासंबंधी आहेत.

इंद्र- इंद्राणी
एकदा युधिष्ठिरने भगवान कृष्णाला रक्षाबंधनाची अशी कथा सांगायला लावली की ज्यामुळे मनुष्याची प्रेतबाधा किंवा दु:ख दूर होते.' भगवान कृष्ण म्हणाला- 'हे श्रेष्ठ पांडवा! एकदा असुर आणि देवतांमध्ये सुरू झालेले युद्ध जवळ जवळ बारा वर्षांपर्यंत चालले होते. असुरांनी देवता आणि त्यांचे प्रतिनिधी इंद्र यांनाही पराजित केले होते. अशावेळी इंद्र देवतांसह अमरावतीला पळून गेले. तर दुसरीकडे विजयी दैत्याने तिन्ही लोकांत आपले वर्चस्व निर्माण केले होते. इंद्र देवाने सभेत उपस्थित राहू नये असे राजपदावरून त्याने घोषित केले आणि देवाने मनुष्याने यज्ञ-कर्म करू नये. सर्व लोकांनी माझी (स्वत: ची) पूजा करावी.

दैत्यराजाच्या या आज्ञेने यज्ञ-वेद, पठण किंवा उत्सव सर्व समाप्त झाले. धर्माच्या नाशामुळे देवतांची ताकद कमी होऊ लागली. हे पाहून इंद्राने आपले गुरू बृहस्पतींच्या चरणी प्रार्थना केली, की गुरूवर्य! अशा परिस्थितीत मला इथेच जीव द्यावा लागेल, मला पळूनही जाता येणार नाही आणि मी युद्धातही टिकाव धरू शकणारर नाही. अशावेळी मी काय करू? काहीतरी उपाय सांगा.

गुरूवर्य बृहस्पतिने इंद्राचे दु:ख ऐकून इंद्राला रक्षाबंधन करण्यास सांगितले. श्रावण पौर्णिमेच्या सकाळीच मंत्राने रक्षाबंधन करण्यात आले.
'येन बद्धो बलिर्राजा दानवेन्द्रो महाबल:।
तेन त्वामभिवघ्नामि रक्षे मा चल मा चल:।'
इंद्राणीने श्रावणी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी द्विजांपासून स्वतिवाचन करून रक्षाचा तंतू घेतला आणि इंद्राच्या मनगटावर बांधून युद्धभूमीवर लढण्यासाठी पाठविले. रक्षाबंधनाच्या प्रभावामुळे दैत्यांनी पळ काढला आणि इंद्राचा विजय झाला. तेव्हापासून राखी बांधण्याची प्रथा प्रचलित झाली आहे.

संरक्षणाचे बंधन-रक्षाबंधन
एकदा राजस्थानच्या दोन राजांमध्ये भांडण चालू होते. त्यातील एका राजावर मोगलांनी आक्रमण केले. आक्रमणाची संधी ओळखून दुसर्‍या राजपूत राजाने मोगलांना मदत करण्यासाठी सैन्य तयार ठेवले होते. पन्ना पण या मोगलांच्या वेढ्यात अडकलेली होती. तिने दुसर्‍या राजाला (म्हणजे मोगलांची मदत करणार्‍या राजाला) राखी पाठविली. राखी मिळाल्यानंतर त्याने उलट मोगलांवरच आक्रमण करून त्यांना पराभव केला. अशा प्रकारे रक्षाबंधनाच्या कच्च्या धाग्याने दोन राजांच्या मैत्रीचे पक्के सूत्र बांधले.

कृष्ण-द्रौपदी  
एकदा भगवान श्रीकृष्णाच्या हाताला जखम झाल्याने रक्ताची धार वाहत होती. हे सर्व पाहून द्रोपदीला राहवले नाही. तिने लगेच आपल्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला. त्यामुळे रक्त वाहणे बंद झाले. कृष्ण- द्रौपदीत बहिण-भावाचा बंध निर्माण झाला. त्यामुळे नंतर जेव्हा दु:शासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण केले त्यावेळी श्रीकृष्णाने तिच्या हाकेला ओ देऊन या बंधनाने दिलेली जबाबदारी पार पाडली. हा प्रसंग रक्षाबंधनाचे महत्त्व दर्शवतो.