गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By
Last Updated : मंगळवार, 25 ऑगस्ट 2015 (16:24 IST)

गुरु-आदित्य योगात बहिणीला हे गिफ्ट देणे शुभ

gift
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला अर्थात 29 ऑगस्ट या दिवशी 12 वर्षानंतर गुरू आदित्य योगात रक्षाबंधन हा सण साजरा केला जाईल. या योगात भावाने बहिणीला दिलेली भेट ऐश्वर्य आणि समृद्धी प्रदान करणारी असेल.
 
ज्योतिषांप्रमाणे श्रावणातील शुक्ल पक्षात पौर्णिमेला धनिष्ठा नक्षत्राचा योग बनत असून हा धनलाभ देणारे आहे. या योगात बहिणीला सोन्याचा किंवा चांदीच्या वस्तू भेट म्हणून दिल्या तर हे भाऊ आणि बहीण दोघांसाठी भरभराटी आणणारे ठरेल.

 
या व्यतिरिक्त या योगात इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स जसे मोबाइल, आयपॉड, घड्याळ, लॅपटॉप, एलसीडी व इतर गिफ्ट देणे ही शुभ फलदायी ठरेल. शुभ मुहूर्तावर सोन्याची वस्तू देण्याने भाऊ- बहिणीचं आयुष्यात वाढतं.