गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By

रक्षाबंधन : राशीनुसार आपल्या भावाला राखी बांधा

रक्षाबंधन हा सण सर्व सणांमध्ये मोठा आणि महत्त्वाचा असतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला रक्षासूत्र बांधते. तेव्हा भाऊ आपल्या यथाशक्तीने बहिणीला भेट देऊन तिच्या रक्षेच वचन घेतो.   
 
मग आता पाहूया राखीच्या या सणासाठी तुमचा रक्षा सूत्र कसा हवा. ज्योतिषानुसार आपल्या भावाला राशीनुसार जर राखीची निवड केली तर तो सूत्र भावासाठी कल्याणकारी राहील.  
 
मेष किंवा वृश्चिक राशी असल्यास लाल रंग किंवा गुलाबी राखीची निवड करावी.  
 
वृषभ किंवा तुला राशीसाठी चांदीची राखी किंवा सिल्वर कलरच्या राखीची निवड करू शकता.  
मिथुन किंवा कन्या राशी असलेले भावांसाठी हिरवा, निळा, गुलाब, सोनेरी रंगाचा निवड योग्य असेल.
 
कर्क राशीच्या भावांसाठी पांढरा, क्रीम, पिवळा, नारंगी रंगाची निवड शुभ ठरेल.  
 
सिंह राशीच्या भावांसाठी गुलाबी, नारंगी, सोनेरी, निळा-काळ्या रंगांनासोडून बाकी सर्व रंगाच्या राखीची निवड करू शकता. 
धनू किंवा मीन राशीच्या लोकांसाठी केशरी, पिवळा, नारंगी, सोनेरी, फिकट लाल रंग शुभ ठरतील.  

मकर व कुंभ राशी असणार्‍या भावांसाठी आस्मानी, निळा, फिरोजी, हिरवा रंग शुभ ठरेल.   
 
या प्रकारे रंगांची निवड करून राखीच्या या पवित्र सणाला तुम्ही खास बनवू शकता.