गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. राखी
Written By वेबदुनिया|

भाऊ-बहिणतील पवित्र प्रेमाचे प्रतीक - रक्षाबंधन

ND
'रक्षाबंधन' हा बहिण भावाच्या अतुट बंधनाचा उत्सव श्रावण महिन्यात येणार्‍या पौर्णिमेला मोठ्‍या उत्साहात साजरा होत असतो. भगवान विष्णूने वामन अवतार धारण करून बळी राजाचा अहंकार धुळीत मिळविला होता. त्याचाही संदर्भ या सणाला आहे. महाराष्ट्रात नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा उत्सव साजरा केला जातो. या दिनी लोक नदी किंवा समुद्र किनार्‍यावर येतात. आपल्या गळ्यातील जानवे बदलतात व स्नानसंध्या आटोपतात. नारळी पौर्णिमेला मासेमारी करणारे कोळी बांधव सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करतात.

'रक्षाबंधन' हा उत्सव भाऊ-बहिण यांच्यातील पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे. या शुभ दिनी बहिण भावाला प्रेमाने राखी बांधते. त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देत असते. भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला यथाशक्तीनुसार भेटवस्तू देत असतो.
'रक्षाबंधन' या सणासंदर्भात एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी- देव व दानव यांच्यात युद्ध सुरू झाले होते. त्यात देव पराभूत होण्याच्या मार्गावर होते. सगळे देव देवराज इंद्राकडे गेले. देवांना भयभीत पाहून इंद्रायणीने त्यांच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले होते. त्या रक्षासुत्रांमुळे देवांमधील आत्मविश्वास जागृत होऊन त्यांनी दानवांवर विजय मिळवला होता. तेव्हापासून राखी बांधण्‍याची प्रथा सुरू झाली, अशी अख्यायिका आहे. ऋषि-मुनींच्या उपदेशाची पूर्णाहुतीही याच दिवशी पूर्ण होत असते. ऋषी त्या काळी राजा महाराजांच्या हातावर रक्षासूत्र बांधत होते. आजही या दिनी ब्राह्मण आपल्या यजमानांच्या हातावर राखी बांधताना दिसतात.

'रक्षाबंधन' हा उत्सव भाऊ-बहिण यांच्यातील पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे. या शुभ दिनी बहिण भावाला प्रेमाने राखी बांधते. त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देत असते. भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला यथाशक्तीनुसार भेटवस्तू देत असतो. या प्रसंगी बहिण- भावांचे बालपण डोळ्यात अश्रुंच्या रूपात तरळत असते. रक्षाबंधन हा सण बहिणीप्रती असलेल्या कर्तव्यांचे स्मरण करून देत असतो.

चित्तौडची राजमाता कर्मवती हिने मुगल बादशाह हुमायू याला भाऊ मानले होते. रक्षाबंधनाला कर्मवती हूमायूला राखी पाठवत असते. संकट काळात हुमायू बादशाह कर्मवती यांच्या रक्षणासाठी चित्तौडगडला धावून येत असे. मात्र आज तर या सणाचे महत्त्व कमी झाले आहे. बहिण-भावांमधील अतूट समजले जाणारे प्रेम आटले आहे. राखी बांधून बहिण व भेटवस्तू देऊन भाऊ आपले कर्तव्य पूर्ण करताना दिसतात. राखीचा पवित्र धागा व त्या मागील भावना लोक विसरत चालले आहेत.