गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By

रामनवमीवर विशेष संयोग...

रामनवमी हा दिवस तर आहेच पण आताची या शुभदिवशी काही आणखी शुभ संयोग घडत आहेत. कोणत्याही प्रकाराची खरेदी, गृहप्रवेश आणि शुभ कार्यांसाठी हा दिवस श्रेष्ठ आहे.
या वर्षी 15 एप्रिलला रामनवमी आहे वरून पुष्य नक्षत्र आणि बुधादित्य योगाचा विशेष संयोग घडून येतोय. या रामनवमीला उच्च सूर्य, बुधसोबत मिळून बुधादित्य योग घडत आहे, हा एक विशेष मुहूर्त आहे.
 
या दिवशी पुष्य नक्षत्र पण आहे, जे सूर्योदय पासून 3 वाजून 35 मिनिटापर्यंत राहील. पुष्य नक्षत्राला बहुमूल्य आणि विशेष वस्तू खरेदीसाठी शुभ मानले आहे. पण यासोबत बुधादित्य योग आणि रामनवमी असल्यामुळे हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे. अनेक वर्षांनंतर हा योग घडून येत आहे.