शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By
Last Updated : गुरूवार, 14 एप्रिल 2016 (15:51 IST)

रावणाने केलेल्या एका चुकीमुळे रामाने त्याचा वध केला

यंदा 15 एप्रिल, शुक्रवारी राम नवमी आहे. मान्यतेनुसार या दिवशी श्रीरामाचा जन्म झाला होता. रावणाचा वध देखील श्रीरामाने केला होता, हे आम्हा सर्वांना माहीत आहे पण फारच कमी लोकांना हे माहीत आहे की रावणाच्या एका लहान चुकीमुळे त्याचा मृत्यू झाला होता. नाही तर राम त्याचा वध करू शकले नसते. रावणाच्या या चुकीबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील पानावर क्लिक करा-  

रावणाला विश्वविजेते बनायचे होते. पण त्याला हे माहीत होते की वरदान मिळाल्याशिवाय हे शक्य नाही आहे. म्हणून त्याने ब्रह्माला प्रसन्न करण्यासाठी तपस्या सुरू करणे सुरू केली. 
रावणाने बर्‍याच वर्षांपर्यंत तपस्या केली पण ब्रम्हदेव काही प्रकट झाले नाही. तेव्हा रावणाने आपली तपस्या अधिक उग्र केली. शेवटी ब्रम्हदेवाला प्रकट व्हावे लागले. 
 

रावणाच्या तपामुळे प्रसन्न होऊन ब्रह्मा आले, त्यांनी रावणाला वरदान मागायला सांगितले. रावणाने म्हटले की हम काहू के मरहिं न मारैं अर्थात माझा मृत्यू कोणाच्या हाताने नाही व्हायला पाहिजे. 
तेव्हा ब्रह्मा म्हणाले की मृत्यूतर निश्चित आहे. तेव्हा रावण म्हणाला की हमा काहू के मरहिं न मारैं, बानर, मनुज जाति दोई बारैं. अर्थात मनुष्य आणि वानराशिवाय मला कोणीही मारू शकत नाही. 

ब्रह्माने त्याला वरदान दिला. रावणाला वाटू लागले की आता देवता ही माझे काही बिघाडू शकत नाही तर मनुष्य आणि वानरतर तुच्छ प्राणी आहे. हे तर माझ्या भोजनाचे सामान आहे. 
वानर आणि मनुष्याला तुच्छ समजून रावणाने फार मोठी चूक केली. आणि हेच त्याच्या मृत्यूचे कारण बनले. रावणाने जर 1 चूक केली नसती तर रामासाठी त्याला मारणे फारच अवघड झाले असते. 
 
या कथेचा सार असा आहे की कुणालाही आपल्यापेक्षा कमी लेखू नका. एक लहान मुंगी देखील मोठ्या हत्तीच्या मृत्यूचे कारण बनू शकते.