शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बेंबळे , सोमवार, 20 एप्रिल 2015 (11:32 IST)

आजपर्यंत विश्वास दाखविलात; यापुढेही दाखवाल!

आजपर्यंत आपण माझ कामगिरीवर विश्वास दाखविलात; यापुढेही दाखवाल अशी खात्री व्यक्त करून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखानचे अध्यक्ष, आमदार बबनदादा शिंदे यांनी सभासदांचा विश्वास सार्थ ठरविणसाठी यापुढील काळात जिवाचे रान करू, अशी ग्वाही दिली. शेतकरी व कामगार हिताला आपले प्राधान्य राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त सभासद, शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा विनिमय   करण्यासाठी रविवारी बोलाविलेल्या सभेत आमदार शिंदे बोलत होते. प्रारंभी संतोष अनभुले, विनायक उबाळे, बंडू ढवळे, पंडित वाघ, शिवाजी कांबळे, दादासाहेब तरंगे आदींनी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याची प्रगती लक्षात घेता या निवडणुकीचे सर्वाधिकार आमदार बबनदादा शिंदे यांनाच देण्यात यावेत, अशी एकमुखी मागणी केली. उपस्थितांनी हात उंचावून याला पाठिंबा व्यक्त केला. 
 
आमदार बबनदादा पुढे म्हणाले, आगामी काळात साखर उतारा वाढविणे, राज्यात शेतकर्‍यांच्या उसाला सर्वाधिक दर देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. 2001 साली स्थापन केलेला 2500 मे. टन गाळप क्षमतेचा कारखाना आज 11 हजार मे.टन ऊस प्रतिदिन गाळप करीत आहे. याबरोबरच एक लाख लिटर इथेनॉल व अल्कोहोल उत्पादन होत असून 38 मेगावॉट क्षमतेचा सहवीजनिर्मितीचा प्रकल्प व्यवस्थित  कार्यन्वित करण्यात आलेला आहे. केवळ 14 वर्षात विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना देशात तीन नंबरचा तर राजत एक नंबरचा ठरला आहे. कारखानत संचालक, सभासद, शेतकरी, कामगार असा भेदभाव नसतो. हे सर्वानी अनुभवले आहेत. 360 कामगार काम केले आहेत. शासनाच सर्व सुविधा तंना पूर्वीपासूनच देत आहोत, असेही ते म्हणाले. 
 
या सभेला हजारो शेतकरी सभासद व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. संचालक वामन उबाळे यांनी सर्वाचे आभार मानले. यावेळी कारखानचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, संजयमामा शिंदे, रणजित शिंदे, मारुती बागल, दादासाहेब जामगावकर, प्रभाकर कुटे, बाळासाहेब ढवळे, सीताराम गायकवाड, विष्णू हुंबे, डॉ. निशिगंधा माळी, स्वाती पाटील, बाबुराव सुर्वे, पोपट चव्हाण आदी उपस्थित होते.