शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मालेगाव स्फोट: साक्षीदारांचे जबाब गायब

मुंबई- मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याची बाब राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केली. तेव्हा सत्तारूढ बाजूचे काही सदस्य हरकत घेऊ लागले. 
 
मालेगाव स्फोट प्रकरणाला काँग्रेसने हिंदू दहशतवाद असे नाव दिले होते. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि कर्नल पुरोहित अटकेत आहेत. हा खटला राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या - एनआयए विशेष न्यायालात सुरू आहे. तेथे पूर्वी असणार्‍या सरकारी वकील रोहिणी सालियन यांना अलीकडेच या खटल्यातून दूर करण्यात आले आहे. त्यांनी वृत्तपत्रात माहिती दिली की खटल्या संदर्भातील साक्षीदारांचे जे पुरावे न्यायालयाने नोंदवून घेतले आहेत ती कागदपत्रे गहाळ झाल्याचे त्या नालयातील काङ्र्काचार्‍यांनी त्यांना सांगितले.