testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चोरांनी फक्त शंभर रुपयांच्या नोटा चोरल्या

Last Modified मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (14:07 IST)
५०० आणि १००० च्या चलनी नोटा बाद झाल्यांनतर काही शहरांमध्ये चोरीचे प्रमाण घटलेले दिसून आले आहे. मात्र घोटी येथे झालेल्या चोरीत फक्त शंभर रुपयांच्या नोटा असणारी रोकड आणि घरातील काही वस्तू चोरल्याची घटना घडली आहे. गावातील आंबेडकरनगर मधील अंजना दिलीप रोकडे या आपल्या कुटुंबासह मुंबई येथे लग्नासाठी गेले होते.
त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील दोन गॅस सिलेंडर, एक मोबाईल व दहा हजार रुपये रोख, केवळ दहा आणि शंभराच्या नोटा चोरट्यानी लंपास केल्या.


यावर अधिक वाचा :