मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

इयत्ता 12 वी आणि 10 वी परिक्षेचे परीक्षा शुल्क निश्चित

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2018 मध्ये घेण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा करीता मंडळामार्फत परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहे. इयत्ता 12 वी कला व वाणिज्य  आणि विज्ञान शाखेसाठी रुपये 430, व प्रात्यक्षिक शुल्क विषयनिहाय रुपये 15, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत प्रविष्ठ होणाऱ्या  परीक्षार्थींचे शुल्क रुपये 800 निश्चित करण्यात आले आहे. 

इयत्ता 10 वी (नियमित व पुर्नपरिक्षार्थी) रुपये 405 ,  श्रेणी सुधार योजने अंतर्गत प्रविष्ठ होणाऱ्या परीक्षार्थींचे शुल्क रुपये 800 याप्रमाणे परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहे. प्राचार्य, मुख्याध्यापक विद्यार्थ्याकडून जादा परीक्षा शुल्क स्विकारण्याबाबतच्या तक्रारी मंडळाकडे आल्या आहेत. तरी प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी जादा परीक्षा शुल्क स्विकारु नयेत. पालक विद्यार्थी यांनी जादा शुल्क न भरण्याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.