शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सहा अभ्यासक्रमांची फी 20 टक्क्याने कमी झाली

राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. खासगी कॉलेजमधील मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, एमबीएसह सहा अभ्यासक्रमांची फी 20 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे.

राज्याच्या शुल्क नियामक प्राधिकरणाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे तीन हजार कॉलेजांमधील तब्बल सहा हजार अभ्यासक्रमांची फी कमी होणार आहे. यामुळे जर मागील वर्षी एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजची पहिल्या वर्षाची फी 1 लाख रुपये असतील, तर यंदापासून ही फी 80 हजार रुपये होईल.