शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 सप्टेंबर 2015 (12:37 IST)

7/11 साखळी बॉम्बस्फोट: 5 जणांना फाशीची शिक्षा

मुंबई- मुंबईतील 7/11च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने 12 दहशतवाद्यांपैकी पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावली तर अन्य सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 
 
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून अख्ख्या मुंबईला हादरवून सोडणाऱ्या 11 जुलै 2006 च्या बॉम्बस्फोटात 189 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. तसेच 800हून अधिकजण जखमी झाले होते. 
 
या प्रकरणी 9 वर्ष न्यायालयात खटला सुरू होता. अखेर न्यायालयाने 12 जणांना या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरविले. त्यांच्या शिक्षेवर न्यायालयात आज अंतिम सुनावणी झाली.