testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ठाकरे बंधूची भेट निव्वळ योगायोग

Last Modified सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (10:02 IST)

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची भेट निव्वळ योगायोग असल्याचा खुलासा शिवसेनेने केला आहे. इंडियन प्रीमियर फुटसाल लीग स्पर्धेनिमित्त आदित्य आणि अमित ठाकरे यांची भेट झाली. लोअर परळमधील सेंट रेजिस हॉटेलमध्ये ठाकरेंची भेट झाली.

त्यानंतर
उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर शिवसेनेने याबाबत खुलासा करत ही भेट योगायोग असल्याचे म्हटले आहे. ‘आदित्य ठाकरे हे एमडीएफएचे अध्यक्ष असल्यामुळे एका फुटबॉल स्पर्धेच्या आयोजकांनी आदित्य यांची भेट मागितली होती. त्याच वेळी आदित्य ठाकरे यांनी फिगो यांची सदिच्छा भेट घेतली. तेथे अमित ठाकरेदेखील उपस्थित होते. तेव्हा आदित्य आणि अमित भेटले, यात विश्लेषण करण्यासारखे काही घडले नाही, दोघांमध्ये कोणतीही राजकीय चर्चादेखील झाली नाही, असा खुलासा शिवसेना जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांनी केला.यावर अधिक वाचा :