testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जन्मानंतर अवघ्या 6 मिनिटात आधार क्रमांक

baby
उस्मानाबाद- तुम्ही तुमचे काढले आहे का? नसेल तर या मुलीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा आणि तातडीने आधार कार्ड काढा. या मुलीचा जन्म महाराष्ट्रातील जिल्ह्यातील एका रूग्णालयात गत रविवारी दुपारी 12 वाजून 3 मिनिटांनी झाला. त्यांनतर 12 वाजून 9 मिनिटांनी तिला मिळाला. जन्म झाल्यानंतर अवघ्या 6 मिनिटात तिला तिचा आधार नंबर मिळाला आहे.
तिच्या आई वडिलांनी याबाबत सजगता दाखवल्याने हे शक्य झाले आहे. भावनाच्या आई वडिलांनी तिच्या आधार कार्डसाठी नोंदणी केली. त्यानंतर त्यांना तिला जन्माचा ऑनलाइन दाखला आणि आधार नंबर मिळाला. युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे तातडीने तिच्या जन्माची नोंद करण्यात आली अशी माहिती उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली.

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ही बाब अत्यंत अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले. लवकरच आम्ही सगळ्या लहान मुलांचे आधार क्रमांक त्यांच्या आई वडिलांच्या आधार क्रमांकाशी जोडणारर आहोत.


यावर अधिक वाचा :