testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हे तर फसवणीस सरकार आहे : अशोक चव्हाण

ashok chouhan
Last Modified बुधवार, 5 जुलै 2017 (17:26 IST)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर टीका केली आहे. मुंबईत शेती होते असा शोध फडवीस सरकारने लावला असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत मुंबईतील शेतक-यांचाही समावेश झाल्याने वाद सुरु आहे.


मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आकडे चुकीचे आहेत अशी कबुली खुद्द सहकारमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतक-यांचा सातबारा कोरा होणार नाही. सरकारचे दावे आकडे फोल आहेत. सरकार आकडे १०-१२ वर्षाचे दाखवत आहे पण प्रत्यक्षात कर्जमाफी मात्र २०१२-१६ या चार वर्षासाठीच देत आहे अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.
कर्जमाफी संदर्भात वारंवार खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देणारे हे सरकार फडणवीस सरकार नाही तर फसवणीस सरकार आहे असे ते म्हणाले.


यावर अधिक वाचा :