बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 जानेवारी 2018 (16:01 IST)

आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

वाहतूक पोलिसाला मारहाण आणि शिवीगाळ केल्या प्रकरणी अचलपूरमधील न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

आमदार बच्चू कडू आणि त्यांचे काही सहकारी २४ मार्च २०१६ रोजी परतवाडा येथील एस. टी. डेपो चौकातून जात होते. बस डेपोजवळ खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस उभ्या होत्या. यावरुन बच्चू कडू यांनी तिथे ड्यूटीवर असलेले वाहतूक पोलीस इंद्रजित चौधरी यांना जाब विचारला. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप करत बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंद्रजित चौधरी यांना शिवीगाळ आणि मारहाण देखील केली. या प्रकरणी चौधरी यांनी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानातील कलम ३५३ (सरकारी कामात हस्तक्षेप), ३३२, १८६ अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाची अचलपूरमधील न्यायालयात सुनावणी सुरु होती. बुधवारी न्यायालयाने बच्चू कडू यांना दोषी ठरवले. कडू यांनी एक वर्षांचा तुरुंगवास आणि ६०० रुपयांचा दंड देखील ठोठावला.

याआधीही आरोप करत कडू यांनी मार्च २०१६ मध्ये मंत्रालयात उपसचिवाला मारहाण केली होती. तर जुलै २०१७ मध्ये अपंग पुनर्वसन कायद्याच्या अंमलबजावणीवरुन त्यांनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तांवरही हात उगारला होता.