testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राज ठाकरे म्हणाले भुजबळ छोडो आंदोलन करा

raj thakare bhujbal
Last Modified सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (17:32 IST)

मुंबई छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत आता भुजबळ जोडो नाही तर ‘भुजबळ छोडो’ आंदोलन झाल पाहिजे असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.नाशिक जिल्ह्यातील भुजबळ समर्थकांनी आज (दि. ५) कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी नाशिकचे माजी खासदार देविदास पिंगळे, आ.जयवंतराव जाधव, आ.नरहरी झिरवाळ, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, राधाकिसन सोनवणे, श्रीमती मायावती पगारे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाशिक महापालिका माजी विरोधी पक्षनेत्या श्रीमती कविताताई कर्डक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, दिगंबर गिते, मालेगावचे माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे, सटाणा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील मोरे, ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, भुजबळ समर्थक बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे, अनिल जाधव, अॅड. सुभाष राउत, विष्णूपंत म्हैसधुणे, राजेंद्र मोगल, विलास बोरस्ते आदी उपस्थित होते.

यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर अन्याय होत असून त्यांच्यावर होणारा अन्याय हा संपूर्ण नाशिक जिल्ह्यावर होत आहे. त्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हा गेल्या दोन वर्षापासून विकासापासून वंचित राहिला आहे.त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व भुजबळ समर्थकांना जोडण्यात येत असून भुजबळांवर होणाऱ्या अन्यायासाठी अन्याय पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यामाध्यमातून विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या जात असून ‘अन्याय पे चर्चेचे’ आयोजन करण्यात आले असल्याच्या आपल्या भावना समर्थकांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्या.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आर्थिक गुन्ह्यांमध्ये छगन भुजबळ यांना अद्यापपर्यंत जमीन मिळणे गरजेचे होते. मात्र त्यांच्यावर सूड बुद्धीने कारवाई होत असून यांच्यावर अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले.यापुढे आता भुजबळ समर्थकांनी भुजबळ जोडो नाही तर भुजबळ छोडो आंदोलन केले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी सर्व भुजबळ समर्थकांच्या भावना समजून घेतल्या.यावेळी मनसे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत हेही उपस्थित होते.यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

national news
सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...