गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होईपर्यंत कर घेणार नाही

मुंबई खड्डेमुक्त होईपर्यंत रस्ते कर घेणार नाही, अशी अनेक आश्वासने  भाजपने जाहीरनाम्यातून दिली आहे. याशिवाय  भाजप मुंबईकरांसाठी करात भरघोस सूट देण्याच्या तयारीत असल्याचं भाजपने जाहीरनाम्यात सांगितलं आहे.

मुंबई महापालिका सध्या रस्ते कर आकारते. एकूण करापैरी साधारण 13 टक्के कर रोड टॅक्समधून जमा होतो. त्यामुळे मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत रोड टॅक्स आकारणार नाही, असं आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिलं आहे. मुंबईकरांना 24 तास पाणी मिळत नाही, तोपर्यंत पाणी पट्टी आकाराली जाणार नाही, अशी भूमिका भाजपने जाहीरनाम्यात घेतली आहे.