बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

भाजप आमदार डॉ. देवराव होळी यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द

भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांचे विधानसभेचे सदस्यत्व उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. डॉ. देवराव होळी हे गडचिरोली जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेत होते. शासकीय सेवेत असतानाच निवडणूक लढवल्याप्रकरणी त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केले आहे.
 
शासकीय सेवेत असताना त्यांनी पैशांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, त्यांच्याविरोधात महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक कायद्यान्वये विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. चौकशीदरम्यानच त्यांनी आपला राजीनामा पाठवला होता. आरोग्य उपसंचालकांनी चौकशी सुरू असल्याने १४ ऑक्टोबर २०१३ रोजी त्यांचा राजीनामा नामंजूर केला. आरोग्य उपसंचालकांच्या या निर्णयाला डॉ. होळी यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) आव्हान दिले होते. परंतु, मॅटने सुद्धा विभागीय चौकशी सुरू असल्याचे कारण सांगून त्यांची याचिका खारीज केली.