testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

रक्तदान करा, साई बाबाचे दर्शन घ्या

शिर्डीच्या साईबाबा संस्थाननं ही अनोखी योजना सुरु केली आहे. यात रक्तदान केल्यानंतर तुम्हाला ताबडतोब शिर्डीच्या साईंचं दर्शन मिळणार आहे. इथल्या रक्तदान युनिटमध्ये यापुढं रक्तदान केल्यास व्हीआयपी पास मोफत दिला जाणार आहे. यामुळं रक्तदानाकडं भाविकांचा ओढा वाढेल आणि या रक्ताचा फायदा गरजूंना होईल असं विश्वस्तांना वाटतं.
साईबाबांच्या चरणी येऊन कोणतंही दान करण्यापेक्षा रक्तदान करण्याची ही आयडीया भक्तांनाही आवडली आहे. भक्तांच्या चालण्यातून वीजेची निर्मिती आणि फुलांच्या निर्माल्यापासून अगरबत्तीची निर्मिती अशा भन्नाट योजनाही संस्थानानं आखल्या आहेत.


यावर अधिक वाचा :