शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सामान्य माणसांना काही मिळाले नाही: पवार

अर्थसंकल्प इतक्या जवळ आला असताना त्यातील घोषणा पंतप्रधानांनी ३१ डिसेंबरलाच जाहीर करुन टाकल्या आहेत, अशी टिपण्णी पवार यांनी केली. नोटबंदीनंतर सरकार काय पावले उचलते याकडे सामान्यांचे लक्ष होते. पण नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी केलेल्या भाषणातून सामान्य माणसांना काही मिळाले असे वाटत नाही. या भाषणात त्यांनी काही घोषणा आधीच जाहीर झालेल्या योजनांच्या आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पात जी धोरणे मांडायची असतात ती त्यांनी आधीच सांगून टाकली आहेत. जो परिणाम झालेला आहे त्यात काही फरक पडणार नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

अर्थसंकल्पाच्या बाबतीत आम्ही विरोध पक्ष म्हणून जो विचार करत आहोत. तोच विचार उद्धव ठाकरे करत असतील तर ही जमेची बाजू आहे, असे त्यांनी सांगितले.