शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

बुलढाणा : महाप्रसाद आयोजन दोन लाख भाविकांनी घेतला आस्वाद

बुलढाणा येथील  40 एकराचा परिसर, 53 पंगती, 2,00,000 लोकांचं जेवण घेतल आहे.. विशेष म्हणजे कोणतीही अस्वच्छता नाही.बुलडाण्यातील मेहकर तालुक्यात हिवरा आश्रममध्ये गेल्या 50 वर्षांपासून साजऱ्या होणाऱ्या विवेकानंद जन्मोत्सवाची लाखोंच्या उपस्थितीत सांगता झाली. यावेळी सामूहिक भोजनादरम्यान सामूहिक शिस्तीची भक्ती दिसली आहे.

बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम या ठिकाणी दर वर्षी विवेकानंद जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. महाप्रसादाने सांगता होणारा हा उत्सव तीन दिवस चालतो. यामध्ये 500 क्विंटलचा महाप्रसाद बनवला गेला. ज्यामध्ये पुरी आणि वांग्याची भाजी असा बेत होता. एका वेळी शिस्तबद्ध पद्धतीने जेवण करणारा असा हा एकमात्र दिवस असले.