Widgets Magazine
Widgets Magazine

ठाणे-भिवंडी रस्ता आठ पदरी करणार

बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (12:23 IST)

ठाणे-भिवंडी रस्ता आठ पदरी करण्याच्या एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी मंजुरी दिली. मंगळवारी मंजूर झालेल्या योजनांत औरंगाबाद-जळगाव-जालना मार्गाचाही समावेश आहे. रस्ता सहापदरी करण्याच्या तीन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पालाही त्यांनी मान्यत दिली आहे.

महाराष्ट्रातील खासदारांशी चर्चा करताना गडकरी यांनी स्पष्ट केले की ठाणे-भिवंडी आठपदरी रस्त्याच्या निविदा काढण्याचे काम १५ दिवसांत पूर्ण केले जाईल व तीन महिन्यांत कामाला प्रारंभही होईल. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री मदन एरावार, खासदार संजय धोत्रे, धनंजय महाडिक, चंद्रकांत खैरे, संजय जाधव, श्रीरंग वारणे, श्रीकांत शिंदे, राजीव सातव आणि मंत्रालय सचिव युद्धवीर सिंह मलिक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, कल्याण-ठाणे-मुंबई जलमार्गासाठी लवकरच निविदा काढण्यात येतील. त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रारंभी ५०० कोटी रुपयांची निविदा काढली जाईल. या कामासाठी केंद्र आणि महापालिका एक-एक हजार कोटी रुपये खर्च करतील.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

शाहीद खाकान अब्बासी हे पाकिस्ताचे नवीन पंतप्रधान

पाकिस्तानी संसदेचे कनिष्ठ सभागृह असणाऱ्या नॅशनल असेंब्लीने आज त्या देशाच्या पंतप्रधानपदी ...

news

गरीब मुलींना लग्नासाठी योगी सरकार देणार 35 हजार रुपये आणि मोबाईल

गरीब मुलींच्या लग्नासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सामुदायिक विवाह ...

news

पाच ऑगस्टला सुद्धा निकाल नाही-तावडे विरोधात हक्कभंग

मुंबई विद्यापीठाने दिलेल्या नव्या डेडलाईनला म्हणजेच 5 ऑगस्टलाही निकाल लागणार नसल्याची ...

news

खेळाद्वारे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या मास्टरचा पोलिसांनी शोध घ्यावा

आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मनप्रीत ...

Widgets Magazine