testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

छगन भुजबळ,समीर भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळला

chagan bhujabal
Last Modified मंगळवार, 19 डिसेंबर 2017 (09:23 IST)

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ या दोघांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांचा दुसऱ्यादा जामीन अर्ज फेटाळला आहे.

‘दोन्ही जामीन अर्ज मी फेटाळत आहे,’ असे म्हणत न्या. एम. एस. आझमी यांनी आदेशाची प्रत दोन दिवसांनंतर उपलब्ध करू, असे म्हटले. यापूर्वी भुजबळ यांनी प्रकृतीचे कारण देत जामिनावर सुटका करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज रद्द केला.

काही आठवड्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलएचे कलम ४५ अवैध ठरविले. त्यामुळे भुजबळ यांनी पुन्हा एकदा जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. मात्र ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी त्यावर आक्षेप घेतला. ‘सर्वोच्च न्यायालयाने पीएलएमएचे कलम ४५ रद्द केले असले तरी अन्य कलमांतर्गत त्यांचा जामीन अर्ज फेटाळला जाऊ शकतो. ८५७ कोटी रुपये मनी लाँड्रिंग घोटाळ्याप्रकरणी भुजबळ यांनी केवळ २० कोटी रुपयांचा हिशेब दिला आहे. बाकीच्या रकमेचा हिशेब ते देऊ शकले नाहीत. त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत बनावट कंपन्या बनवून त्यामध्ये सर्व बेहिशेबी रक्कम गुंतवली. तसेच भुजबळ समाजातील प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका केली, तर ते साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे,’ असा युक्तिवाद वेणेगावकर यांनी न्यायालयात केला होता.यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

national news
सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...