गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Updated :मुंबई , शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2014 (13:48 IST)

CM शपथविधी सोहळ्याचं काऊंटडाऊन, वानखेडेवर पोलीस फौजफाटा

महामुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं काऊंटडाऊन सुरु झाले आहे. वानखेडे स्टेडियमवर होणा-या सोहळ्याची विशेष तयारी पाहायला मिळतेय. वानखेडेवर या सोहळ्यासाठी भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर कडक सुरक्षेसाठी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय. सुमारे 2500 हजार पोलिस, शीघ्र कृती दल आणि राज्य राखीव पोलिस बलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.
 
पंतप्रधान मोदींसह पाच हजार व्हीव्हीआयपींसह तब्बल 30 हजार व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षेत कोणतीही कसूर राहू नये यासाठी मुंबई पोलिस प्रयत्नशील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या उपस्थितीत होणा-या या सोहळ्यासाठी सर्व व्यवस्था चोखपणे उभ्या राहाव्यात यासाठी प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. वानखेडेवर होणा-या या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधानांसह दिल्लीतील दिग्गज नेते, खेळाडू, कलाकार, उद्योगपती यांसह विविध मान्यवर हजर राहणार आहेत. त्यामुळं वानखेडेवर सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आलीय.  
 
आजच्या शपथविधी सोहळ्याची कल्पना ही वाजपेयींच्या एका भाषणावर आधारित आहे. वाजपेयींनी एक भविष्यवाणी १९८० साली मुंबईमधल्याच अधिवेशनात केली होती. आज वाजपेयींची ही भविष्यवाणी खरी ठरणार आहे. वाजपयींच्या या स्वप्नावर आधारित आजचं सेलिब्रेशन असणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतल्या अरबी समुद्रात कमळ फुलणार आहे.